29 Dec 2011

दोन क्षणांची साथ..

कॉलेजमधल्या तरुणांना प्रेमाबद्दल विचारल्यास ते भरभरून बोलतात.. कारण प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे त्यांच्यापेक्षा चागल्यारीतीने कोणीच पटवून देवू शकत नाही.. काहीना या प्रेमाचा आनद शेवटपर्यंत अनुभवता येतो तर काहीना हे प्रेम म्हणजे काही क्षणासारखे असते.. जे कधी येते कधी जाते तेच कळत नाही.. पण ते प्रेमाचे जगलेले दोन क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य जगल्यासारखे  भासतात तेव्हा.. अशाच त्या जगलेल्या दोन क्षणांची एक कविता आज माझ्या वाचनात आली.. मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडेल..          

दोन क्षणांची साथ होती
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला

त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

27 Dec 2011

मी नाही प्यायलो..

३१ डिसेंबर जवळ येतोय मित्रानो.. सगळ्यांचे मस्त प्लान झाले असतील.. जे पितात त्यांचासाठी ३१ डिसेंबर म्हणजे जीव की प्राण असतो आणि जे नाही पित त्यांच्यासाठी ३१ डिसेंबर म्हणजे डोक्याला ताप असतो.. असो पण ३१ डिसेंबर म्हणजे कामातल्या धावपळीतून मिळाली थोडीशी विश्रांती आणि जुने वर्ष विसरून नवीन वर्षाचे केलेले स्वागत.. पण यानंतर १ तारखेला मिळणाऱ्या बातम्यांमध्ये सर्वात महत्वाची बातमी असते ती दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे झालेले अपघात.. अशीच एक कविता माझ्या वाचनात काल आली... कवितेतला प्रत्येक शब्द विचार करायला लावणारा आहे.. आयुष्याचे महत्व या ३१ डिसेंबरच्या आनंदापेक्षा किती महत्वाचे आहे याच उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता.. तेव्हा ३१ डिसेंबर च्या रात्री दारू पिऊन गाडी चालावण्याआधी या कवितेची एकदा तरी आठवण करा..  

आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !

आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!
       
  

26 Dec 2011

आज मला खरच प्रेम झाले..

आजकाल प्रेम या गोष्टीला तितकेसे महत्व दिले जात नाही.. कॉलेजला जायचे आणि प्रेमाच्या नावावरून टाईमपास करायचा ह्याला आजकालचे प्रेम असे म्हटले जाते.. पण याच प्रवासात एक न एक दिवस त्या तरुणाला किवा तरुणीला नकळत खरे प्रेम होऊ जाते.. आणि मग आजपर्यंत प्रेमाचे धिंडवडे उडवणारे हे तरुण तरुणी आपले प्रेम व्यक्त तरी कसे करायचे या विचारात मग्न होते आणि तेव्हा त्यांना जाणीव होते की आपल्याला  प्रेम झाले.. कसेही का असेना पण प्रेमाचे महत्व प्रत्येकाला आयुष्यात एकदा न एकदा तरी कळतेच.. अशीच एक माझी कविता मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल..

का कुणास ठाऊक पण आज मला खरच प्रेम झाले..

प्रेमाला नेहमीच मस्करीत घेतले,
आज ही उद्या ती करत नेहमीच प्रेमाचे धिंडवडे उडवले,
पण आज ती समोर आली आणि मनात तिच्या विचारांचे वारे वाहू लागले,
का कुणास ठाऊक पण आज मला खरच प्रेम झाले..   
 

23 Dec 2011

काचेची बरणी आणि २ कप चहा

आपल्यासारख्या बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो तो म्हणजे आयुष्य नक्की कसे जगायचे.. कुठच्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे आणि मग त्यातून होणारा फायदा तो किती यातून मिळणारे सुख ते किती.. हे असे सर्व प्रश्न माणसाच्या मनात नेहमीच येत असतात.. काहीना याची उत्तरे सापडतात काहीना सापडूनही ते न सापडल्यासारखे त्याच प्रश्नांच्या भोवती घुटमळत जगात असतात.. असाच एक एकदम साधा पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणारा लेख माझ्या वाचनात आला.. अत्यंत सोप्या उधारनासह आयुष्याचे गणित यात लेखकाने मांडले आहे.. मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडेल..         

--------------------

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही
अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी..

पुढे वाचा..  

21 Dec 2011

असे जगावे

माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर नक्कीच या समाजासाठी काही तरी करावे असे मला वाटते.. नुसते जन्माला येऊन स्वतापुर्ता विचार करून जगण्यास काहीच अर्थ नाही असे मला वाटते..  आपल्या स्वप्ने पाह्नायचा अधिकार आहे आणि ती प्रत्येकाने पहावीच आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची एक जिद्द प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे असे मला वाटते.. तेव्हा जन्माला आलो आहे म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जन्माला आलो आहे यासाठी माणसाने जगावे.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा आहे.. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता नक्की आवडेल..     

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची

20 Dec 2011

बेळगाव आमचेच...

कालचे राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे मराठी मनावर केलेला एक प्रकारचा घावच होता.. अर्थात राज ठाकरे जे काही बोलले ते practically आणि त्या गोष्टीवर विचार केला जाऊ शकतो पण बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे मग ते असे सहजासहजी का म्हणून कर्नाटकला द्यावे.. आणि तिथल्या मराठी भाषिकांची काय  इच्छा आहे याचा तर आधी विचार केला पाहिजे अश्याच काही गोष्टीवर आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर असलेला हा माझा लेख आहे.. कृपया करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा..

------------------

नुकतीच बेळगाव महानगर पालिका कर्नाटक सरकारने बरखास्त केली आणि याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.. त्यांच्या मनात आशा होती की तरुणांच्या मनात वसलेला हा नेता नक्कीच काही तरी योग्य युक्तिवाद किवा मार्गदर्शन करेल...




19 Dec 2011

हा भारत माझा मराठी मूव्ही ट्रेलर ...

अण्णा हजारेनी  गेल्यावेळेस केलेले आंदोलन खूप गाजले आणि थोड्या प्रमाणात का होईना जनजागृती झली म्हणायला हरकत नाही.. काल युटूब वर असाच टाईमपास करत बसलो होतो आणि सहज नजरेस पडला तो "हा भारत माझा" या मराठी चित्रपटाचा ट्रेलर.. भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांची लढाई आणि भ्रष्टाचारात वेढलेले सामान्य नागरिक या विषयांवर बेतलेला हा सिनेमा आहे... ट्रेलर तर खरच खूप छान आहे आणि म्हणून मला तो तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल... कृपया ट्रेलर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..            

हा भारत माझा मराठी मूव्ही ट्रेलर 
 
 
 
 

16 Dec 2011

माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी तू..

प्रेम ही गोष्ट जवळ असताना जितकी चांगली वाटते कधी कधी ती दूर असतानाही चांगली वाटते.. प्रत्येकाचे प्रेम यशस्वी होतेच असे नाही.. काहीना यात सुख मिळते तर काहीना दुख मिळते.. पण हे दुख प्रेम असूनही मिळते मग फक्त काही कारणास्तव आपल्या प्रेमाचे बलिदान द्यायचे.. या गोष्टी घडताच असतात.. पण ब्रेकअप झाल्यानंतरही कुठे तरी हे प्रेम जगातच असते.. पण त्याला टाळणे हाच एक शेवटी पर्याय असतो.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी तू.. कवीने खूप साध्या भाषेत पण ब्रेकअप नंतरच्या नाजूक भावनांना या कवितेत बांधले आहे.. प्रत्येक कॉल्लेगेकुमाराची ही अशीच काहीशी अवस्था असते.. मी आशा करतो की तुम्हाला आवडेल...       

माझा sms न वाचता,
तो delete करणारी तू...
माझा call पाहता,
तो cut करणारी तू...
मी समोर दिसता,
मला न पहिल्या सारखं करून,
पुढे निघून जाणारी तू...
अन,
पुढे गेल्यावर,
हळूच मागे वळून,
मला पाहणारी तू...

आपल्या breakup नंतर,
आपल्याच मित्रान मध्ये,
मला विसरण्याचा प्रयेत्न करणारी तू...
अन,
कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर,
फक्त गप्पा राहणारी तू ...

माझी आठवण,
आल्यावर चोरून रडणारी तू...
आणि,
जगा समोर गोड गोड हसणारी तू..

रोज मला पाहून,
न पहिल्या सारखा करणारी तू...
अन,
माझ्या हातात सिगारेट पहिली कि,
"सिगारेट टाक खाली,
आणि घरी जा... "
असं,
फोने करून बजावणारी सुधा तूच....

प्रेम असून हि,
नाही असं भासवणारी तू...
अन,
ब्रेकअपनंतर सुद्धा,
माझ्या वर जीवापाड ,
प्रेम करणारी तू...
माझ्या वर जीवापाड,
प्रेम करणारी तू...

अपरिचित      

15 Dec 2011

नसेन मी जेव्हा - संकेत शिंदे(मराठी मंच)

आज तुमच्या आयुष्यात माणसांचा पसारा असेल.. काही जण तुमची स्तुती  करत असतील आणि काही जण मागून बोलत असतील.. हे असेच असते याबद्दल वाद नाही..  पण तरीही कधी विचार केला आहे.. तुम्ही गेल्यावर काय चित्र असेल तुमच्याबद्दल याच लोकांच्या मनात... ज्यांनी आयुष्युभर तुमची साथ दिली त्या व्यक्तींची अवस्था ती काय  असेल.. तुमचे मित्र, प्रेयसी किवा बायको, तुमचे नातेवाईक.. कशी होईल त्यांची अवस्था जेव्हा तुम्ही नसाल.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली.. नसेन मी जेव्हा.. संकेत शिंदे यांनी लिहलेली ही कविता खरच खूप अप्रतिम आहे.. क्षणभर विचार करायला लावणारी आहे..              

नसेन मी जेव्हा...
वारा वाहील तेव्हाही होऊन वेडापिसा
कोसळणाऱ्या पावसाचा नसेल भरवसा
समुद्राच्या उधाणाला तोड नक्कीच नसेल
कोणास ठाऊक  तेव्हा मी कोणत्या वेशात असेन?






13 Dec 2011

आताशा असेहे मला.....

माणसाच्या आयुष्यात दुख तर खूप असतात पण प्रत्येक जन हे दुख विसरून पुढचे आयुष्य जगात असतो.. पण कधी कधी आयुष्यात असेही क्षण येतात ज्यावेळेस काही जुन्या आठवणी मनावर ताबा घेतात आणि तेव्हा नकळत त्या आठवणीत डोळे कधी भरून येतात तेच कळत नाही.. मग का कुणास ठाऊक पुन्हा त्याच क्षणांची त्याच दिवसांची हे मन पुन्हा मागणी करत असते.. खरच  आयुष्यात जगलेले क्षण पुन्हा हवेच असतात पण ते शक्य नसते, पण मग तरीही का बरे हे मन  त्या क्षणांच्या मागे धावत असते.. खरच सलीलच्या आवाजातले हे गाणे मला नेहमी ह्याच प्रश्नात पाडत असते ज्याचे उत्तर मला अजून पर्यंत मिळाले नाही.. पण तरीही जेव्हा ही मी माझ्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांची आठवण करत असतो तेव्हा मी न चुकता हे गाणे ऐकतो.. कारण आयुष्यात कधी तरी कोणासाठी रडण्यास काहीच हरकत नाही असे मला वाटते.. खरच हे गाणे तुमच्याही मनात  कुठे तरी दडलेल्या जुन्या आठवणीना जागवत असेल ना????    



आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते , आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते , बरा  बोलता  बोलता  स्तब्द्ध  होतो 

कशी  शांतता  शून्य  शब्दात  येते, आताशा  असेहे  हे मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते

कधी  दाटू  येत  पसारा  घनांचा, कसा  सावळा रंग  होतो  मनाचा
असे  हलते  आत  हळूअव्र  काही
जसा  स्पर्श  पाण्यावरी  चंदनाचा
आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते

असा  ऐकू  येतो  क्षणांचा   इशारा
शनी  वर्थ  होतो  दिशांचा  पसारा
नभातून  ज्या  रोज  जातो  उडोनी
नभाशीच  त्या  मागू  जातो  किनारा
आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते
न  अंदाज   कुठले  न  अवधान  काही
कुठे  जायचे  यायचे  भान  नाही
जसा  गंध  निघतो  हवेच्या  प्रवासात
न  कुठले  नकाशे  न  अनुमान  काही
कशी  हि  अवस्था  कुणाला  कळावी , कुणाला  पुसावी  कुणी  उत्तरावी
किती  खोल  जातो  तरी  तोल  जातो , असा  तोल  जाता  कुणी  सावरावे
आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते
बरा   बोलता  बोलता  स्तब्द्ध  होतो
कशी  शांतता  शून्य  शब्दात  येते
आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे  पाणी डोळ्यात  येते..!!!!


12 Dec 2011

एक अजनबी सा....

एक अजनबी सा एहसास दिल को सताए.. लकी चित्रपटातले हे गाणे.. खरच कुछ तो बात हे इस गानेमे.. अदनान सामी  आणि त्यांच्यासोबत खुद लता मंगेशकर यांचा आवाज.. खरच हे गाणे ऐकताना मन कुठे हरवून जाते ते कळतच नाही...  गाण्यातला प्रत्येक शब्द प्रेमाचे पुस्तक हळुवार उघडत असते आणि आपले मन या पुस्तकात कधी स्वतःला हरवून बसते तेच कळत नाही.. या गाण्याची दुसरी खास बात म्हणजे या गाण्याचे संगीत.. गाण्याचे शांत संगीत गाण्यातल्या प्रत्येक शब्दाला न्याय देणारे आहे.. त्यामुळे हे गाणे कितीही वेळा ऐकले तरीही कंटाळा येत नाही खासकरून रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपले मन हे फक्त आपलेच असते.. हे गाणे तुम्ही  ऐकलेही असेल पण पुन्हा ऐकण्यात काहीच हरकत नाही...  कधी तरी सेंटी होऊन जगण्यात ही मजा असते बरोबर ना.. बरोबर ना.. एन्जोय..!!





एक अजनबी सा एहसास दिल को सताए
शायद यही तो प्यार हैं
बेताबियोंमें धडकन मेरी चैन पाए
शायद यही तो प्यार हैं

कुछ भी कहा ना, कुछ भी सुना ना, फिर भी
बेचैन दिल हैं हमारा
बहके कदम हैं, मुश्किल में हम हैं, देखो
संभले भला कैसे यारा
चाहे बिना भी नजदिक हम चले आए
शायद यही तो प्यार हैं

नजरें बिछा दे पहरे लगा दे, दिल पे
पर दिल किसी की ना माने
काँटों पे चल के, शोलों में जल के,रो के
मिल के रहेंगे दीवाने
चाहत की लौ तो, आँधी में भी झिलमिलाए
शायद यही तो प्यार हैं

ये मुलाकातें, ये तेरी आँखें, बातें
एक पल ना मैं भूल पाऊँ
कितनी मोहब्बत, हैं कितनी चाहत तुमसे
कैसे भला मैं बताऊँ
अच्छा लगे जो तू सामने मुस्कुराए
शायद यही तो प्यार हैं
 

या दारूची नशा काही वेगळीच असते...

दारू प्यालेल्या माणसांना आपण सर्वांनी पहिलेच आहे, खूप मजा येते अशा माणसांना पाहायला.. हा झाला गमतीचा भाग पण तुम्हीही कधी दारू प्यायलाच असाल, नसाल प्यायला तर चांगलीच गोष्ट आहे... पण आजकाल कामाचा व्याप एवढा वाढला आहे की प्रत्येक माणसाला आठवड्यातून एकदा का होईना या थकव्यासाठी टोनिक लागतेच.. आणि मग सुरु होतात त्या गमतीदार गप्पा ऑफिस, प्रेम, मैत्री या सर्व गोष्टीवर चर्चा होते.. आणि आठयाभारचा थकवा थोडा का होईना कमी तर नक्कीच झालेला असतो.. अशीच एक माझी कविता मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल.. मी आशा करतो की ही कविता तुम्हाला आवडेल..            

या दारूची नशा काही वेगळीच असते,
आठवध्याभराच्या थकव्यानंतर शनिवारची रात्र येते,
आणि मग मित्राची मेहफिल जमते,
आणि timepass म्हणून दारू तर नकीच कंपनी  देते,
सोडा कम ३०-३० ने सुरवात होते,
आणि दोन घोट उतरल्यावर खऱ्या विषयांना सुरवात होते,
मग बॉसला शिव्या घालण्यातच ३० ची नशा उतरू लागते,
आणि महत्वाच्या विषयांवर यायला ६० ची गरज भासू लागते,
प्रेमावर बोलायला तर सगळेच शहाणे तयार असतात,
कारण आपल्यासारखे  प्रेम कोणीच केलेले नसते,
मग दारू बोलते कि माणूस हेच कळत नसते,
पण यात ती मुलगी मात्र नक्कीच बदनाम झालेली असते,
प्रेमाच्या विषयात ६० कधी संपते हेच कळत नाही,
मग तिला विसरण्यासाठी फिनिशिंग ६० ची गरज भासू लागते,
ही ६० उतरल्यावर विषयांना काहीच जागा नसते,
आणि कोणाचा आवाज मोठा याचीच स्पर्धा सुरु असते,
मग यात तर कोण बदनाम होत आहे याचेही भान नसते,
कारण आता माणसाची जागा दारू ने घेतलेली असते,
आठवध्याभराच्या थकव्याला एक टोनिक मिळालेले असते,
खरच या दारूची नशा आणि यातून होणारी माणसाची दशा  काहीशी वेगळीच असते...!!!!     

सुशांत बनकर.  



10 Dec 2011

आठवणीतले कॉलेज

कॉलेज म्हणजे धमाल, कॉलेज म्हणजे मस्ती, कॉलेज म्हणजे मैत्री आणि कॉलेज म्हणजे प्रेम.. कॉलेज म्हटले की अभ्यास कमी आणि या गोष्टी आल्याच पाहिजेत.. त्याशिवाय कॉलेजला आणि तरुणाईला अर्थच राहत नाही.. तुम्हीही ही धमाल मस्ती केलीच असेल.. शाळा सुटल्यावर नवीन मित्र, नवीन वर्ग, नवीन कॅन्टीन सगळे काही नवीन आणि यात बंधनही नाही कोणाचे.. आयुष्यात सगळ्यात आनंदाचे क्षण म्हणजेच कॉलेज..  हेच कॉलेज आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते  आणि मागे ठेवून जातात त्या फक्त आठवणी.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली, जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.. मी आशा करतो की तुम्हाला ही कविता नक्की आवडेल...    

फ़क्त आठवणीच हाती

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती

अपरिचित  


9 Dec 2011

क्रिकेट एक धर्म..

नुकतीच बातमी वाचली वीरेंद्र सेहवागला २५ लाखाचे बक्षीस घोषित केले गेले आहे.. ही खूप आनंदाची बाब आहे आणि केलेच पाहिजे.. शेवटी भारताचे नाव त्याने रोषण केले आहे.. तुम्हालाही वाचून आनंद झालाच असेल.. पण मला नाही झाला तितका.. क्रिकेट हा आपल्या भारतात एका  धर्मासारखा बनला आहे. या क्रिकेटर्सना ही अशी बक्षिसे दरवर्षी जाहीर होत असतात. आणि इतर खेळ भारतात खेळले जातात की नाही या बदल फार मोठी शंका निर्माण होते.. काही दिवसांपूर्वी महिला व पुरुष कब्बडी संघांनी विश्व कप  जिंकला त्यांना काय मिळाले.. वीरेंद्र सेहवागला एकट्याला जितकी रक्कम मिळाली असेल तेवढी त्या पूर्ण संघाना मिळाली असेल.. इतकेच न्हवे तर त्यांना आपापल्या घरी परतण्यासाठी वाहनांची सोय ही न्हवती या महान खेळाडूंनी अखेर रिक्षानी प्रवास केला आणि तरीही याबद्दल कुठेच आणि कसलाही आवाज उठला नाही.. मिडियावाले तर कोणत्या बातम्या दाखवत असतात ते त्यांनाच माहित इतर वेळेस शुल्लक कारणांवरून अर्ध्या अर्ध्या तासाच्या बातम्या बनवणारे हे लोक ही गोष्ट फक्त १० मिनिटे दाखवून संपवतात याचेच मोठे नवल वाटते... या गोष्टीवर आवाजही उठवला जातो पण पुढे काय होते तेच कळत नाही.. या मंत्र्यांना हे सांगावे लागते की आपल्या देशात क्रिकेट सोडूनही इतर काही खेळ खेळले जातात तेव्हा त्यांना जाग येते आणि मग काही रक्कम घोषित करून विषयच संपवतात..

आणि हे फक्त कब्बडी या खेळापुरतेच नाही आहे हॉकी, खो खो, अथेलेटिक्स, फूटबॉल या खेळांची ही हीच अवस्था आहे.. आपल्या महाराष्ट्रामधील एक महिला वेटलिफ्टर आहे तिचे वडील शेतकरी आहेत. त्या महिलेमध्ये एवढे गुण आहेत की तिची निवड ऑलम्पिकसाठी झाली आहे.. पण या सर्व गोष्टीना लागणारे सामान आणि प्रवास खर्च हा त्यांना परवडणारा नाही आहे.. मग या खेळाडूंचे भवितव्य काय आहे हाच प्रश्न निर्माण होतो आणि शासनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करते हीच मोठी दुखाची बाब आहे.. भारतीय खेळाडूंकडे नक्कीच गुणांची कमी नाही आहे फक्त कमी आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि सोयीसुविधांची.. या सोयीसुविधा जर यांना वेळच्या वेळी पुरवल्या गेल्या तर नक्कीच ओलम्पिक मध्ये पहिल्या ५ देशांच्या नावात एक नाव असेल ते म्हणजे "भारत". मी आशा करतो की क्रिकेटला जो न्याय मिळतो तो इतर  खेळांनाही लवकरात लवकर मिळेल..                            

  सुशांत बनकर.  

नजरेचा हा खेळ न तुला कळला न मला कळला...

कॉलेजमध्ये प्रत्येकाला हा अनुभव आलाच असेल.. तुमची ही नजर एखाद्या मुलीच्या नजरेशी  नक्कीच भेटली असेल.. आणि मग सुरु झाला असेल तो नजरेचा खेळ..  सुरु होते ती वेगळीच मजा मग कधी नजरेतूनच हसायचे, नजरेतूनच रागवायचे, सारे सारे काही नजरेतूनच बोलायचे.. दुसऱ्यांना कळो किवा न कळो तुमच्या नजरेची भाषा तिला आणि तिच्या नजरेची भाषा तुम्हाला नक्कीच कळली असेल.. अशीच माझी एक कविता नजरेचा खेळ..!!! मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडेल.. आवडल्यास तुमचे मत मांडायला विसरू नका.. 

नजरेचा हा खेळ न तुला कळला न मला कळला,

कॉलेजचा पहिला दिवस माझी नजर तुझ्या नजरेस मिळाली,
आणि त्याच दिवशी तू माझी नसताना ही माझीच झाली,
मग हळू हळू दिवस सरत गेले आणि हा नजरेचा खेळ असाच चालू राहिला,
माझी नजर रोज तुला काही तरी सांगत होती,
आणि मग तुझी नजर आपोआप झुकत होती,
नजरेत प्रश्न खूप होते पण त्यांची उत्तरे सापडत न्हवती,
कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुझ्या नजरेतच  कुठे तरी दडली होती,
कधी तुझी हीच नजर मला पाहताच हसत होती,
तर कधी तुझी हीच नजर मी न दिसल्यास रागवत होती,
कदाचित दोघांच्याही नजरेत एक प्रेमाची आशा दडली होती,
आणि ती नजरेतूनच कळावी हीच दोघांची इच्छा होती,
मग कधी तुझी नजर जुकायची, हसायची, रागवायची, आणि रोज काही तरी नवीन सांगायची,
आणि मला याच गोष्टींची गम्मत वाटायची,
कारण शेवटी माझ्या नजरेला तुझ्याच नजरेची भाषा कळायची,
परंतु अखेर हा नजरेचा खेळ अबोलच राहिला,
आणि नजरेतला खेळ शेवटी नजरेतच हरवला,
खरच नजरेचा हा खेळ न तुला कळला न मला कळला...!!!!

सुशांत बनकर.




8 Dec 2011

क्षितीज...

माणसाची स्वप्ने खूप मोठी असतात आणि असावीच कारण त्यासाठीच तर आपण जन्म घेतला आहे.. आयुष्यात नेहमी एक ध्येय असावे, लांब पल्ला गाठण्याची एक जिद्द असावी.. जर आयुष्यात हे ध्येय नसेल तर माणूस म्हणून जन्माला येऊन काहीच अर्थ नाही. आणि नुसते ध्येय ठेवूनही काही उपयोग नसतो कारण ते ध्येय गाठण्यासाठी लागते ती जिद्द.. आज एक कविता वाचनात आली.. खरच साध्या शब्दातली कविता आहे तरीही मनात एक विश्वास जागवणारी आहे.. आपल्या सर्वांसमोर एक ध्येय आहे आणि हे कविता ते ध्येय गाठण्याचे बळ आपल्याला देते.. मी आशा करतो की तुम्हाला आवडेल...          

क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते..
जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.
कारण त्याला आपण गाठायचे असते..
एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते,
आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते.
पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते..
तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते,
क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते..
त्याला आपण गाठायचे असते..

कवी - अपरिचित



7 Dec 2011

तेव्हा मी बोललो सॉरी राँग नंबर - अवधूत गुप्ते

बऱ्याच दिवसांनी अवधूत गुप्तेंचे एक चांगले गाणे  ऐकायला मिळाले. कदाचित तुम्ही ऐकले ही असेल हे गाणे.. पण तरीही गाणे मे कुछ तो बात हे.. कधी हरवलेले प्रेम पुन्हा भेटले आहे का तुम्हाला? काय अवस्था होती त्यावेळेस तुमची? बोलण्यासाठी शब्दही नसतात.. आणि खरच ती भेट तेव्हा रॉंग नंबर लागल्या सारखीच  असते. खूप साधे गाणे आहे पण अवधूतचा आवाज आणि  गाण्यातले काही छानसे शब्द यामध्ये आपण कधी हरवले जातो तेच कळत नाही.. मला खात्री आहे की तुम्हाला आवडेल.. :)    

   

फिर से मुझे स्कूल - SAY BAND

शाळा कोणाला नाही आवडत? आपल्या सगळ्यांनाच आवडते. कितीही मोठे झालो तरी शाळेतले दिवस विसरू शकत नाही.. आयुष्यातले पहिले मित्र इथेच भेटतात. पहिले प्रेमही इथेच होते. एवढेच न्हावे तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या शाळाच शिकवते.. शाळेत होतो तेव्हा कधी कॉलेजला जाणार असा विचार असायचा आणि मग कॉलेजला गेल्यावर आपली शाळाच बरी होती असे वाटायचे... खरच आजही तुम्ही शाळेतले काही मित्र भेटत असाल आणि आठवत असाल ते शाळेतले दिवस.. आठवत असाल उगाचच केलेली ती भांडणे आणि आठवत असाल ४ , ५ जणांनी खालेला तो एकच वडापाव.. असेच एक say band चे गाणे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे गाणे ऐकले ही असेल पण तरीही शाळेतली मजा काही वेगळीच होती तेव्हा शाळेत केलेल्या त्या मजा मस्तीला पुन्हा एकदा आठवण्यास काहीच हरकत नाही..

 
वर्गांच्या बाकांवर नाव लिहिलेली
शाळेच्या बस मध्ये मस्ती  केलेली
कॉलेजला मस्तीची होतात लफडी
नावांच्या जागेवर प्रेमाची कोडी
स्कूल मी रोजाना जाने का अलग था मजा
फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा

शाळेचा पहिला  दिवस आठवतो
पावसाने भिजलेले रस्ते
आणि शाळेत जायचा म्हणून भिजलेले डोळे
सगळं काही नवीन नव्या बाई नवा वर्ग
धावत जाऊन पकडलेला मागचा बेंच
आणि मागच्या बेंचवरुन पाहिलेली
पोर... पहिल्या रोची वही खरडत बसणारी
मागे सगळे अवली त्यांच्या वह्या चोरणारी
कॉलेजमधे सारे बेधुंद वारे
क्लासरूम मधे टीचर कट्यावर सारे
टीचर कि वो दात खा लेने दो दोबारा
फिर से मुझे स्कूल मी जाने दोना जरा
ए भइ..पहिली पकडलेली कॉलर
पहिला दिलेला धक्का
मोठ्यांमध्ये राहून खूप वेळेला ऐकलेली
शिवी.... पहिली वाहिली थोडीशी अडखळलेली
पोरींनी केली चुगली पण मित्रांनी तारीफ केली
कॉलेजला आई बहिणीं झाल्या विदेशी
शिव्यांची स्पर्धा हि पोरा पोरींची
पेहली गाली का वो बचपन चला हि गया
फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा 

प्रार्थना हि शाळेतच म्हंटली जायची
रिकाम्या जागा भरा जोड्या लावा
हे प्रश्न शाळेत किती सोपे वाटायचे
पण आता काय सविस्तर उत्तरे द्या शास्त्रीय करणे द्या
अरे हा!... प्रश्न आले कि आठवते
परीक्षा ती शेवटची शेवटची ठरलेली
प्रश्नालाही त्या शेवटच्या शाळाही सरलेली
कॉलेजला  होतात पासिंग चे झोल
भरवल्या  छड्यांना घंटेचे टोल
जब छोटा था कितना प्यारा था जहां
लागता ही क्यू मुझको मै यू बडा हो गया
 फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा
      

6 Dec 2011

नो फेसबुक & ट्विटर????

नुकताच मटा च्या वेबसाईटवर बातम्या वाचत होतो आणि वाचता वाचता एका बातमीने लक्ष वेधून घेतले "फेसबुक ट्विटर वर केंद्र सरकारची करडी नझर" आता या बातमीवर हसावे की रडावे काहीच कळत न्हवते. एकीकडे तरुणांनी समाजात विलीन व्हावे यासाठी हे राजकारणी धडपडत असतात आणि जेव्हा फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरून जेव्हा हा तरुण जनजागृती करण्याचे काम करत असतो तेव्हा त्यांच्या या कामावर बंदी आणण्याचा विचार हे लोक करतात आणि हीच फार मोठी शरमेची बाब आहे. आणि यामागे कारण ही तसेच आहे कारण सध्याची वाढती महागाई आणि इतर सगळ्या ठिकाणांचे कॉंग्रेस सरकारचे प्रताप यामुळे गेल्या ३, ४ महिन्यात हेच कॉंग्रेस वाले बदनाम होत आहेत ना? मग स्वतःची बदनामी बघवत नाही त्यांना आणि त्यासाठीचे हे सर्व प्रताप चालू आहेत. पण या गोष्टी करून आधीच नझरेतून उतरलेले कॉंग्रेस सरकार आज आणखी नझरेतून उतरले आहेत. या अश्या गोष्टींवर करडी नझर ठेवण्यापेक्षा जरा देशावर लक्ष केंद्रित करा.. आणि योग्य मार्गाने कामे करा मग कोण कशाला तुम्हाला बदनाम करेल. तुम्ही जर चांगली लोकहिताची कामे केली तर नक्कीच आम्ही तरुण मंडळी तुम्हाला उचलून घेऊ.. पण अजूनही पोट ना भरलेले हे कसली चांगली कामे करणार.. पण तरीही कॉंग्रेस सरकारने हेच लक्षात घ्यावे की तरुणांच्या वाटेवर जाऊ नका.. तुमचे घाणरडे राजकारण तुम्ही तुमच्या विरुद्ध उभ्या असलेल्या पक्षाबरोबरच खेळा.. जर का हा तरुण भडकला तर तुम्हालाही माहित आहे काय होऊ शकत ते....

Source :फेसबुक, ट्विटरवर केंद्राची करडी नजर

सुशांत बनकर.             


सुखाचे क्षण..

नुकताच फेसबुकवर टाईमपास करत होतो आणि असेच बघता बघता काही ओळी नझरेस पडल्या. आणि त्या इतक्या  आवडल्या की शेअर केल्याशिवाय राहवलेच नाही. आयुष्य म्हणजे नक्की काय ? आपण कधी मनापासून या गोष्टीचा विचार केला आहे का? प्रत्येक माणूस हा सुखाच्याच मागे धावत असतो आणि सुख समोर असूनही काही वेळेस तो दुखला आपलेसे करत असतो. दुर्दैवाने मला हे जे कोणी लिहले त्याचे नाव नाही सापडले.. पण ज्यानीही लिहले आहे कदाचित त्यालाच माहित असावे की आयुष्य कसे जगावे.. मी आशा करतो की तुम्हाला आवडेल..        
आयुष्य हे चहाच्या कप सारखे असतं...
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात
अवती भोवती पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,,
अरेच्या! साखरच घालायला विसरलो कि काय...

... पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही
कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती,
कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर....

आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे...
 

5 Dec 2011

कधीतरी वेड्यागत - संदीप खरे

संदीप खरेंची ही कविता खूपच छान आहे. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला  नेहमीच काही तरी करण्याची इच्छा असते. मग कधी पंख लावून या आकाशात उंच भरारी घ्यायची असते तर कधी काहीतरी नवीन करायचे असते. संदीप खरेंनी अश्याच काही विचारांना या कवितेतल्या शब्दात बांधले  आहे. अर्थात त्यांच्या इतर कवितेप्रमाणे या कवितेतही त्यांनी शब्दांचा योग्य वापर केला आहे आणि कवितेचे प्रत्येक कडवे आपल्याला हेच सांगत असते की अरे खरच कधी तरी वेड्यागत वागायला हवे.. संदीप खरेंच्या या छानश्या अश्या कवितेला अमृता सुभाष आणि मधुर वेलणकर यांनीही छानशी अशी साथ दिली आहे.. मला खात्री आहे तुम्हाला ही कविता नक्की आवडेल..  

     
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवुन
कशासाठी सजायचे चापून चोपुन?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबु कधी म्हणायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

भांड्यावर भांडे कधि भिडायला हवे
उगाचच सखिवर चिडायला हवे
मुखातुन तिच्यावर पाखडत आग
एकिकडे प्रेमगीत लिहायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

विळीपरी कधि एक चंद्रकोर घ्यावी
हिरविशी स्वप्ने धारेधारेने चिरावी!
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधितरी विचारावाचुन!
झाडापास झोंबुनिया हाति येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्‍याची चाल दैवासारखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! …..कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

स्वतःला विकुन काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!
हपापुन बाजारात मागशिल किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा!
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजुन, आहे रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला ह वे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे! 

4 Dec 2011

मे जिंदगी का साथ निभाता चला गया - देवा आनंद

सुप्रसिद्ध अभिनेता देवा आनंद यांचे आज निधन झाले.. बातमी ऐकून खूप वाईट वाटले. कारण बॉलीवूड सिनेसृष्टीला या कलाकाराने एक नवीन ओळख निर्माण करून दिली. देवा आनंद म्हटले की आठवते ती त्यांची एक अनोखी अदा.. आणि याच अदेवर त्यांनी अख्ख बॉलीवूड जिंकले होते.. देवा आनंद यांच्या सिनेमाची आणखी वैशिष्ट म्हणजे त्यांच्या सिनेमातली गाणी.. त्यांच्या सिनेमातील प्रत्येक गाणी आणि त्या गाण्यावर केलेला त्यांचा अभिनय या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांच्या आयुष्याची पाने उलघडत असतात.. असेच त्यांचे एक गाणे मला खूप आवडते जे मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल.. पण त्याआधी बॉलीवूड सिनेसृष्टीतल्या या महान अभिनेत्याला माझा सलाम.. तुम्ही आमच्यात नसलात तरी तुमची आठवण सदैव आमच्यासोबत आहे..



3 Dec 2011

ओठांवर आलेले शब्द..

कॉलेजमध्ये असताना नक्कीच तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल.. तिच्यशी बोलण्याची मनात इच्छा ही खूप असेल पण तरीही तिच्या नकाराच्या भीतीने किवा आणखी काही कारणांमुळे त्या गोष्टी तुमच्या मनातच राहतात.. या सर्व प्रेमाच्या कालावधीत किती तरी विचार तुमच्या मनात येत असतील पण ते विचार ओठांवर न येता मनातच दडून बसले असतील. मग तिच्यासाठी ५ रुपयांचे विकत घेतलेले फुल आजही तुमच्या एखाद्या पुस्तकात तसेच सुकून पडलेले असेल.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली खूप साध्या भाषेत आहे पण तरीही मनाला भावणारी आहे.. दुर्दैवाने मला या कवीचे नाव नाही सापडले... मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल..         

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील..

अपरिचित 

खरच आज मला थोडे...

प्रेम हे नक्की तरी किती करायचे असते कधी कधी याचाच विचार पडतो.. काही जन तर या प्रेमात इतके हरवून जातात की त्यांना स्वतःचाही विचार कधी मनात येत नाही... पण कधी न कधी या गोष्टीची जाणीव होतेच प्रत्येकाला, अशीच माझी एक कविता आज मला थोडे माझ्यासाठी जगू दे...!!!! प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुणाला स्वतःबद्दलची जाणीव ही  प्रेमभंग झाल्यावरच होते. मग प्रेमात हरलेला तो स्वतःला जगण्यासाठी  काही गोष्टी तिच्याकडेच मागत असतो... अशीच माझी कविता..  मी आशा करतो की तुम्हाला ही कविता आवडेल.. कृपया कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक  करा..

आज मला थोडे माझ्यासाठी जगू दे...!!!!

सुशांत बनकर.  

2 Dec 2011

भटक्या मतदारांविरोधात राज ठाकरे..

नुकताच बातम्या पाहत होतो.. एक न्यूज पाहिली  राज ठाकरेंनी भटक्या मतदारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. ऐकून चांगले वाटले. कारण आज मुंबईमध्ये इतके रस्त्यवर राहणारे लोक आहेत की त्यांचा वापर हे राजकारणी बोगस मतदार म्हणून चांगल्या प्रकारे करून घेतात. एक १०० किवा ५०० रुपयांची नोट खूप होते या लोकांसाठी.. राज ठाकरे यांनी उचललेले हे पाऊल खरच स्तुतीजनक आहे. एवढेच न्हवे तर नेहमी पुरावे देऊन बोलणारे राज ठाकरे यावेळेसही पुराव्यासकटच बोलले. सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर रस्त्यावर झोपणाऱ्या एका बाईकडे पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, इतकेच न्हवे तर तिच्याकडे आधार कार्ड ही आहे. या सर्व गोष्टी पोस्टाने घरी येतात मग रस्त्यावरच्या बाईकडे या सर्व गोष्टी कश्या असा प्रश्न त्यांनी विचारला असून निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी असे ते म्हणाले. मुंबई मध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी सापडतील. माझ्यामते राज ठाकरेनप्रमाणे  इतर ही पक्षांनी हे पाऊल उचलायला हवे तेव्हा कुठे जाऊन या गोष्टी थांबतील आणि मीडियानेही या गोष्टीची दखल घेऊन अश्या गोष्टी कुठे होत असतील तर त्या लोकांच्या निदर्शनास आणून द्यायला हव्यात. असो यावरती नक्कीच काही तरी तोडगा निघेल अशी आशा करूया...      


सुशांत बनकर.

   

1 Dec 2011

मलाही वाटते कोणी तरी आपले असावे

प्रेम हे एकदा तरी करून पाहावे अशी सर्वांचीच इच्छा असते काहींची ती इच्छा पूर्ण होते काहींची नाही.. मग त्या इच्छा पूर्ण न झालेल्या तरुणाच्या मनात विचारांचा भडीमार सुरु असतो.. आणि त्याला वाटत असते की मला ही प्रेम झाले असते, मी ही कुणाबरोबर तरी फिरलो असतो, सुख दुख अनुभवले असते... खरच रोज त्याच्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे कोणी तरी आपले असावे.. अशीच एक माझी कविता मलाही वाटते कोणीतरी आपले असावे... मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही कविता आवडेल.. कृपया कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद..

कोणी तरी आपले असावे...!!!! 

सुशांत बनकर.          

30 Nov 2011

व्यथा - मिथिल शिंदे (मराठी मंच )

आज असाच मराठी कविता सर्च करत बसलो होतो वाचण्याचा खूप मूड होता.. आणि वाचता वाचता सहज एक कविता नजरेस पडली.. कवितेचे नाव आहे व्यथा.. एखाद्या मुलीचे आयुष्य किती सुंदर असते आणि बलात्कार नावाचे क्रूर कृत्य तिच्यासोबत घडल्यानंतर तिचे आयुष्य कसे होते याची उत्तम मांडणी या कवितेत दिसली.. कवितेतल्या काही ओळी तर इतक्या भाऊक करतात की बोलण्यास शब्दच उरत नाही... कविता तशी मोठी आहे पण वाचण्याजोगी आहे.. तेव्हा मित्रानो नक्की वाचा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल.. कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..     

व्यथा - मिथिल शिंदे

नको करू सखे असा साजिरा शृंगार - संदीप खरे

संदीप खरे यांची एक अप्रतिम कविता आणि अश्या या अप्रतिम कवितेवर मधुरा वेलणकर यांचा तितकाच अप्रतिम अभिनय.. कवितेतल्या प्रत्येक शब्दाला मधुरा वेलणकर यांनी आपल्या अभिनयातून हुबेहूब सादर केले आहे.. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल..  





नको करू सखे असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई?
माज्या मरणाची उगा उठेल आवई!

कशासाठी घालायचे काजल डोळ्यात?
गर्द दोहावर रानी पसरेल रात!

मुखाला लखाकी अशी कशास द्यायची?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटित लपेटू नको काया धुंध फुन्द!
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध!

नको करू सखे असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार!

नको करू सखे! नको करू!!

29 Nov 2011

अण्णा हजारेंचा कॉंग्रेसला आणखी एक इशारा...

लोकपाल बिल पास करू आणि एक योग्य असे लोकपाल बिल लोकांपुढे मांडू असे म्हणणारे कॉंग्रेस सरकार अचानक बदलले आहे. दिलेला शब्द न पाळता या वरती आणखी चर्चा करून प्रत्येक विभागाला वेगळे असे नियम लागू करू असे म्हणत अण्णा हजारेनी मांडलेल्या लोकपाल बिलाला  कमकुवत  करण्याचे  काम हे कॉग्रेस सरकार करत आहे.  आणि यासाठीच  अण्णा हजारेनी  ११ डिसेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण जंतरमंतर मैदानामध्ये करण्याचे ठरवले आहे. आणि २२ डिसेंबर पर्यंत यावर काहीही तोडगा न निघाल्यास  २७   डिसेंबर पासून रामलीला मैदानावर आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. हीच खरी वेळ आहे कॉंग्रेस सरकला लोकशाहीची ताकद काय असते ते दाखवून द्यायची. पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाला रस्त्यावर उतरून या सरकारला त्यांची जागा  दाखवायची आहे. अर्थातच अण्णांच्या अहिंसेच्या मार्गानेच... तेव्हा मित्रानो तयार राहा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी... मी तयार आहे तुम्ही तयार आहात का ??

सुशांत बनकर  


  

28 Nov 2011

पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत

पाहिलंय मी तुला.. ही कविता तशी मला सहजच सुचली.. एखादा प्रियकर या जगातच राहिला नाही आहे आणि त्याच्या आठवणीत त्याच्या प्रेयसीची नक्की कशी अवस्था असेल आणि तीच तिची अवस्था त्याच प्रियकराने आपल्या कवितेत कशी मांडली असती याचा एक छोटासा प्रयत्न.. मी अपेक्षा करतो कि तुम्हाला आवडेल...     
पाहिलंय मी तुला

पाहिलंय मी तुला आपल्या पहिल्या भेटीचा तो क्षण आठवताना,
पाहिलंय मी तुला मी जवळ आल्यावर गोड असे लाजताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत स्वताला विसरताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत स्वतःशीच बोलताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत रडताना,
पाहिलंय मी तुला माझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मानता जपून ठेवताना,
पाहिलंय मी तुला माझी एकाच कविता पुन्हा पुन्हा वाचताना,
हो पाहिलंय मी तुला असेच काहीसे जगताना,

आज मी तुझ्यासोबत नाही आहे,
पण मी आजही पाहतो आहे तुला,
फक्त माझी आठवण जपण्यासाठी जगताना..!!!

26 Nov 2011

चांदण्या रातीतील आपली ती भेट असावी

आज कालच्या धक्का धक्कीच्या जीवनात एका प्रियकराला नीट तिच्या प्रेयसीशी भेटता हि येत नाही.. मग चांदण्या रातीतल्या भेटी स्वप्नातःच किवा मनामध्येच रंगवाव्या लागतात... असाच एक प्रियकर ही भेट कशी रंगवत असेल याबद्दल मी केलेली एक छोटा प्रयत्न म्हणजेच माझी एक छोटीशी कविता... मला अपेक्षा करतो की  तुम्हाला आवडेल.. कृपया कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...   

चांदण्या रातीतील भेट 

२६/ ११...

आज २६/११ ला ३ वर्षे पूर्ण झाली आणि काही जुन्या जखमा आज पुन्हा ताज्या झाल्या सारख्या वाटल्या.. २६/११ हल्ल्याबाबत तर सर्वाना सर्वच गोष्टी माहित आहेत, पण त्या गोष्टींचे पुढे काय  झाले. आपले नाकर्ते राजकारणी.. आणि २६/११ मध्ये आपले प्राण गमावलेले काही शूर योद्धे.. पण या योद्ध्यांना खरच न्याय मिळाला का? असाच माझा एक लेख २६/११ - ३ वर्षानंतर. कृपया लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
२६/ ११ - ३ वर्षानंतर        

अशी केली हेडलीने २६/११साठी तयारी



  
सुशांत बनकर

25 Nov 2011

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्याबद्दल...

काल हरविंदर सिंह नावाच्या एका तरुणाने महागाईच्या विरोधात थेट कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केला... राजकीय क्षेत्रातून या गोष्टीला तीव्र विरोध दर्शवला गेला.पण सामान्यांचे मत कोणीच जाणले नाही.. सामान्य नागरिकाने या हल्याचे स्वागतच केले आहे.. आणि आपल्या मीडियाला सामान्यांच्या प्रतीकीयेपेक्षा राजकीय लोकांच्या प्रतिक्रियेची जास्त गरज भासली होती.. पुन्हा एकदा सामान्य माणूस असाच नझरअंदाज केला गेला आहे.. असाच एक लेख माझ्या वाचनात काल रात्री आला..आणि मला तो तुमच्यासोबत शेयर करावासा वाटतो आहे..       

  माझा सलाम....!!! - संकेत शिंदे



24 Nov 2011

महिला विश्वचषक कब्बडी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा अपमान...


भारतात दरवेळेस घडणारी आणि तितकीच लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे. भारतात क्रिकेट या खेळलाच महत्व दिले जाते आणि बाकीचे खेळांना काडीमात्र हि किंमत दिली जात नाही. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार हॉकी संघाबरोबर घडला होता आणि आज महिला कब्बडी संघाबरोबर आणि हे प्रकार घडल्यावर क्रीडा मंत्र्यांचे डोळे उघडतात.. देव करो आणि यापुढे क्रीडा मंत्र्यांचे डोळे सताड उघडे राहो, त्यांना कळो की भारतात क्रिकेट बरोबर आणखी ही काही  चांगले खेळ खेळले जातात..      


Charoli 1

दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार,
एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार,
तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार,
आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

सुशांत बनकर.   

Charoli

कविता करणे मला तसे जमत नाही,
पण मनातल्या भावना कागदावर उतरवायला जमतात,
या भावना म्हणजे  तुझी जपून ठेवलेली एक आठवण असते,
पण शेवटी कागदावर उतरल्यावर तुझी ती आठवण कविता म्हणून बदनाम झालेली असते...!!!!   

सुशांत बनकर.   

Hindi Shyari 2

प्यार तो उनसे बेपन्हा करते हे पर कभी बया न कर सके,
मिलने की तमन्ना तो उनसे बेपन्हा हे पर फिर भी कभी उनसे मिल न सके,
यूतो उन्हें भुलाने की कोशिश भी बहुत की,
पर उनकी यादो को अपनेसे कभी जुदा न कर सके...!!!!

सुशांत बनकर. 
 

23 Nov 2011

संदीप खरे - सांग सख्या रे

प्रेमात तिच्याबद्दल बरेच काही लिहू शकतो आपण.. पण खरी भावना तिच्यावरचे खरे प्रेम हि ती गेल्यावरच समझते... मग या निसर्गाच्या पसार्यात ही मग फक्त तीच दिसते... आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग फक्त तिचाच शोध सुरु होतो अगदी तिच्यावर लिहलेल्या कवितेतही... अशीच एक संदीप खरे यांची कविता..       


या गाण्याच्या lyrics  साठी कृपया खालील लिंक वर क्लिक  करा...
सांग सख्या रे | sang sakhya re lyrics

21 Nov 2011

आयुष्यावर काही

आयुष्यावर तसे बऱ्याच कविता लेख लिहले गेले आहेत. पण तरीही हे आयुष्य एवढे काही शिकवत असते की त्यावर किती लिहले तरी कमीच आहे असे वाटते... माणूस जन्माला आल्यावर त्याने नक्की कसे जगायचे किवा त्याला कसे जगायचे आहे हे फक्त त्यालाच माहित असते.. अशीच माझी एक कविता कि मला कसे जगायचे आहे... आणि आयुष्याच्या शेवटी आपल्याला काय मिळणार आहे... मला खात्री आहे तुम्हाला आवडेल..

आयुष्य... 

तुझ्यावर काव्य करताना..

आपल्या प्रेयसी वर कविता करताना एखादी व्यक्ती किती भावनेत वाहून गेलेली असते... मग तिच्यावर कविता करताना शब्दानाही तो अचूकपणे निवडत असतो कारण शब्दानेही तिला छेडावे हे त्याला मान्य नसते अशीच एक कविता मला वाचताना सापडली मला खात्री आहे तुम्हाला ही आवडेल...
खट्याळ शब्द.. 

17 Nov 2011

Hindi shyari 1

दिलको कितना समझाते हे  पर समझा नहीं पाते,
उनको भुलाना चाहते हे  पर भुला नहीं पाते,
ए दिल चले गये हे वो  अपने जिंदगी से,   
फिर भी क्यो हम उनके बिना जी नहीं पाते... 

Hindi Shyari..

आजकाल निंद क्या हे वो भूल गये हे हम,
आपकी यादो मे कुछ  इस तऱ्ह से खो गये हे हम,
रुथ न जन हमसे  कभी ए जानेमन,
आपकी आंखो मी हमारी जिंदगी देखते हे हम...!!!!  
सुशांत बनकर.  
     

माझ्या शब्दांची तू....

प्रेम म्हणजे नक्की तरी काय? प्रेम म्हणजे एखाद्याच्या आठवणीत स्वतःला विसरणे, त्याच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण आठवणे, मग ती गेल्यावर तिच्यासाठी शब्दांना कवितेत बांधणे... पण शेवटी ती सोबत नाही म्हणून अखेर त्याच शब्दांना आणि कवितेला झुगारून देणे... अशीच माझी एक कविता----

तू आणि शब्द 

15 Nov 2011

दोन मित्र...

एकदा  दोन  मित्र ,१  हिंदू  आणि  दुसरा  मुसलमान , रस्त्याने  बरोबर  चालले  असतात.
 तेवढ्यात, त्यांना  रस्त्यात  वीस (20) रुपयाची  नोट   दिसते .
मुसलमान  मित्र  एकदम  excite होऊन  म्हणतो ,
"बीस  मिल्हा!!"
त्यावर  हिंदू  मित्र  चिडून  मानतो ,
 "दस   तुला , दस   मला !!!!!"

हास्यरंग | Marathi Jokes  

इतकी नाजुक इतकी आल्लाड.. - संदीप खरे

इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार

इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक

कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला

इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक

इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते

इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे

संदीप खरे - सलील कुलकर्णी | Sandip Khare - Salil Kulkarni 

तुझे नि माझे नाते काय ? - संदीप खरे



अल्बम :- सांग  सख्या  रे 
तुझे  नि  माझे  नाते  काय ?...
तू  देणारी  मी ... मी  घेणारा
तू  घेणारी ... मी  देणारा
कधी  न  कळते  रूप  बदलते
चक्राचे  आवर्तन  घडते
आपुल्यामधले  फरक  कोणते ?
अन  आपुल्यातून  समान  काय ?....

मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...
सुंदर  स्वप्ने  पडत  असतील ,
पण  कुशीवर  वळेल... उसासेल...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल
तिच्यासमोरही   तेच  ढग .. जे  माझ्यासमोर !
तिच्यासमोरही  तेच  धुकं .. जे  माझ्यासमोर !
तिचे  माझे  स्वल्पविरामही  सारखे  अन  पूर्णविरामही !
म्हणून  तर  मी  असा  आकंठ  जागा  असताना
तिचीही  पापणी  पूर्ण  मिटली  नसेल ...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...

सुखादुखाची  होती  वृष्टी
कधी  हसलो, कधी  झालो  कष्टी
सायासावीन  सहजची  घडते
समेस  येता  टाळी  पडते!
कुठल्या  जन्मांची  लय  जुळते ?
या  मात्रांचे  गणित  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय  ?...

बगीचे  लावले  आहेत  आम्ही  एकत्र ... एकाकी
माती  कळवली  आहे  आम्ही  चार  हातानी
नखात  माती  आहे  आम्हा  दोघांच्या ...अजूनही
मनात  फुला  आहेत  आम्हा  दोघांच्या ... अजूनही
दोघांच्याही  हातावर  एकमेकांच्या  रेषा   आहेत  !
दोघांच्याही  ओठांवर   एकमेकांच्या  भाषा  आहे  !
रात्री  होऊन  जाईल  चंद्र  चंद्र  आणि  मी  जागाच  असेन ;
तेव्हा  बर्फाच्या   अस्तराखाली  वाहत  राहावी  नदी
तशी  ती  ही  जागीच  असेल ...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...

नात्याला  या  नकोच  नाव
दोघांचाही  एकच  गाव !
वेगवेगळे  प्रवास  तरीही
समान  दोघांमधले  काही  !
ठेच  लागते  एकाला
का  राक्तले दुसर्याचा  पाय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय  ?...

संदीप खरे - सलील कुलकर्णी | Sandip Khare - Salil Kulkarni  

14 Nov 2011

भावना..

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस कारण तो काही क्षणांचा असणार आहे,
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस कारण एक दिवस त्याची राख होणार आहे,
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे,
कारण त्या जर तू समजलीस तर मी सदैव तुझ्यासोबतच असणार आहे...!!!       

सुशांत बनकर. 

चारोळी 

एक मुलगी..

एक मुलगी तिचा स्वतःचा नं. तिच्या BF च्या मोबाईल मधून डायल करते, हे बघण्यासाठी कि त्याने तिचा नं. काय नावाने सेव केलाय ......जस.. ..बाहुली , शोना...

आणि तिला धक्काच बसतो.

ते नाव असत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तुकाराम प्लंबर.

हास्यरंग | Marathi Jokes

रात्रीतली तुझी आठवण...!!!!

रात्रीचा चंद्र आणि चांदण्यांची रात्र,
आणि या रात्रीच्या सोबतीला तुझ्या आठवणींचे सत्र,
मग कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर झुलत राहयचे,
आणि डोळे घट्ट मिटून फक्त तुला आठवत राहयचे,
झोप येत नाही म्हणून खिडकीत उभे राहयचे,
आणि आकाशातल्या चमचमणाऱ्या प्रत्येक ताऱ्यात पुन्हा तुलाच शोधू पहायचे,
या प्रत्येक ताऱ्यात तुझे बहुरूप अनुभवायचे,
आणि हा तर माझा तो तर माझा करत प्रत्येक ताऱ्याला आपले करायचे,
मग हळूच नजर त्या चंद्राकडे फिरवायची,
आणि अबोल अश्या त्या चंद्राकडे फक्त तुलाच मागायचे,
दिवस तर कशाही सरतो,
पण माझी प्रत्येक रात्र मी अशीच काहीशी जगतो,
कधी या चंद्र ताऱ्यांकडे रोज तुला मागायचे,
तर कधी तुझ्या आठवणीत स्वतःशीच काही तरी पुटपुटआयचे,
आता फक्त दोनच इच्छा मनात आहेत,
एकतर पुन्हा तुझा होऊन तुझ्यासाठी जगायचे,
नाहीतर कधी ही न संपणाऱ्या या रात्रीत रोज स्वतःला मरताना पहयाचे..!!!!

सुशांत बनकर.           

तू आणि शब्द...!!!!