30 Nov 2011

व्यथा - मिथिल शिंदे (मराठी मंच )

आज असाच मराठी कविता सर्च करत बसलो होतो वाचण्याचा खूप मूड होता.. आणि वाचता वाचता सहज एक कविता नजरेस पडली.. कवितेचे नाव आहे व्यथा.. एखाद्या मुलीचे आयुष्य किती सुंदर असते आणि बलात्कार नावाचे क्रूर कृत्य तिच्यासोबत घडल्यानंतर तिचे आयुष्य कसे होते याची उत्तम मांडणी या कवितेत दिसली.. कवितेतल्या काही ओळी तर इतक्या भाऊक करतात की बोलण्यास शब्दच उरत नाही... कविता तशी मोठी आहे पण वाचण्याजोगी आहे.. तेव्हा मित्रानो नक्की वाचा मला खात्री आहे तुम्हाला आवडेल.. कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..     

व्यथा - मिथिल शिंदे

नको करू सखे असा साजिरा शृंगार - संदीप खरे

संदीप खरे यांची एक अप्रतिम कविता आणि अश्या या अप्रतिम कवितेवर मधुरा वेलणकर यांचा तितकाच अप्रतिम अभिनय.. कवितेतल्या प्रत्येक शब्दाला मधुरा वेलणकर यांनी आपल्या अभिनयातून हुबेहूब सादर केले आहे.. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल..  





नको करू सखे असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई?
माज्या मरणाची उगा उठेल आवई!

कशासाठी घालायचे काजल डोळ्यात?
गर्द दोहावर रानी पसरेल रात!

मुखाला लखाकी अशी कशास द्यायची?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटित लपेटू नको काया धुंध फुन्द!
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध!

नको करू सखे असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार!

नको करू सखे! नको करू!!

29 Nov 2011

अण्णा हजारेंचा कॉंग्रेसला आणखी एक इशारा...

लोकपाल बिल पास करू आणि एक योग्य असे लोकपाल बिल लोकांपुढे मांडू असे म्हणणारे कॉंग्रेस सरकार अचानक बदलले आहे. दिलेला शब्द न पाळता या वरती आणखी चर्चा करून प्रत्येक विभागाला वेगळे असे नियम लागू करू असे म्हणत अण्णा हजारेनी मांडलेल्या लोकपाल बिलाला  कमकुवत  करण्याचे  काम हे कॉग्रेस सरकार करत आहे.  आणि यासाठीच  अण्णा हजारेनी  ११ डिसेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण जंतरमंतर मैदानामध्ये करण्याचे ठरवले आहे. आणि २२ डिसेंबर पर्यंत यावर काहीही तोडगा न निघाल्यास  २७   डिसेंबर पासून रामलीला मैदानावर आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. हीच खरी वेळ आहे कॉंग्रेस सरकला लोकशाहीची ताकद काय असते ते दाखवून द्यायची. पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाला रस्त्यावर उतरून या सरकारला त्यांची जागा  दाखवायची आहे. अर्थातच अण्णांच्या अहिंसेच्या मार्गानेच... तेव्हा मित्रानो तयार राहा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी... मी तयार आहे तुम्ही तयार आहात का ??

सुशांत बनकर  


  

28 Nov 2011

पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत

पाहिलंय मी तुला.. ही कविता तशी मला सहजच सुचली.. एखादा प्रियकर या जगातच राहिला नाही आहे आणि त्याच्या आठवणीत त्याच्या प्रेयसीची नक्की कशी अवस्था असेल आणि तीच तिची अवस्था त्याच प्रियकराने आपल्या कवितेत कशी मांडली असती याचा एक छोटासा प्रयत्न.. मी अपेक्षा करतो कि तुम्हाला आवडेल...     
पाहिलंय मी तुला

पाहिलंय मी तुला आपल्या पहिल्या भेटीचा तो क्षण आठवताना,
पाहिलंय मी तुला मी जवळ आल्यावर गोड असे लाजताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत स्वताला विसरताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत स्वतःशीच बोलताना,
पाहिलंय मी तुला माझ्या आठवणीत रडताना,
पाहिलंय मी तुला माझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मानता जपून ठेवताना,
पाहिलंय मी तुला माझी एकाच कविता पुन्हा पुन्हा वाचताना,
हो पाहिलंय मी तुला असेच काहीसे जगताना,

आज मी तुझ्यासोबत नाही आहे,
पण मी आजही पाहतो आहे तुला,
फक्त माझी आठवण जपण्यासाठी जगताना..!!!

26 Nov 2011

चांदण्या रातीतील आपली ती भेट असावी

आज कालच्या धक्का धक्कीच्या जीवनात एका प्रियकराला नीट तिच्या प्रेयसीशी भेटता हि येत नाही.. मग चांदण्या रातीतल्या भेटी स्वप्नातःच किवा मनामध्येच रंगवाव्या लागतात... असाच एक प्रियकर ही भेट कशी रंगवत असेल याबद्दल मी केलेली एक छोटा प्रयत्न म्हणजेच माझी एक छोटीशी कविता... मला अपेक्षा करतो की  तुम्हाला आवडेल.. कृपया कविता वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...   

चांदण्या रातीतील भेट 

२६/ ११...

आज २६/११ ला ३ वर्षे पूर्ण झाली आणि काही जुन्या जखमा आज पुन्हा ताज्या झाल्या सारख्या वाटल्या.. २६/११ हल्ल्याबाबत तर सर्वाना सर्वच गोष्टी माहित आहेत, पण त्या गोष्टींचे पुढे काय  झाले. आपले नाकर्ते राजकारणी.. आणि २६/११ मध्ये आपले प्राण गमावलेले काही शूर योद्धे.. पण या योद्ध्यांना खरच न्याय मिळाला का? असाच माझा एक लेख २६/११ - ३ वर्षानंतर. कृपया लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
२६/ ११ - ३ वर्षानंतर        

अशी केली हेडलीने २६/११साठी तयारी



  
सुशांत बनकर

25 Nov 2011

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्याबद्दल...

काल हरविंदर सिंह नावाच्या एका तरुणाने महागाईच्या विरोधात थेट कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केला... राजकीय क्षेत्रातून या गोष्टीला तीव्र विरोध दर्शवला गेला.पण सामान्यांचे मत कोणीच जाणले नाही.. सामान्य नागरिकाने या हल्याचे स्वागतच केले आहे.. आणि आपल्या मीडियाला सामान्यांच्या प्रतीकीयेपेक्षा राजकीय लोकांच्या प्रतिक्रियेची जास्त गरज भासली होती.. पुन्हा एकदा सामान्य माणूस असाच नझरअंदाज केला गेला आहे.. असाच एक लेख माझ्या वाचनात काल रात्री आला..आणि मला तो तुमच्यासोबत शेयर करावासा वाटतो आहे..       

  माझा सलाम....!!! - संकेत शिंदे



24 Nov 2011

महिला विश्वचषक कब्बडी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा अपमान...


भारतात दरवेळेस घडणारी आणि तितकीच लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे. भारतात क्रिकेट या खेळलाच महत्व दिले जाते आणि बाकीचे खेळांना काडीमात्र हि किंमत दिली जात नाही. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार हॉकी संघाबरोबर घडला होता आणि आज महिला कब्बडी संघाबरोबर आणि हे प्रकार घडल्यावर क्रीडा मंत्र्यांचे डोळे उघडतात.. देव करो आणि यापुढे क्रीडा मंत्र्यांचे डोळे सताड उघडे राहो, त्यांना कळो की भारतात क्रिकेट बरोबर आणखी ही काही  चांगले खेळ खेळले जातात..      


Charoli 1

दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार,
एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार,
तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार,
आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!

सुशांत बनकर.   

Charoli

कविता करणे मला तसे जमत नाही,
पण मनातल्या भावना कागदावर उतरवायला जमतात,
या भावना म्हणजे  तुझी जपून ठेवलेली एक आठवण असते,
पण शेवटी कागदावर उतरल्यावर तुझी ती आठवण कविता म्हणून बदनाम झालेली असते...!!!!   

सुशांत बनकर.   

Hindi Shyari 2

प्यार तो उनसे बेपन्हा करते हे पर कभी बया न कर सके,
मिलने की तमन्ना तो उनसे बेपन्हा हे पर फिर भी कभी उनसे मिल न सके,
यूतो उन्हें भुलाने की कोशिश भी बहुत की,
पर उनकी यादो को अपनेसे कभी जुदा न कर सके...!!!!

सुशांत बनकर. 
 

23 Nov 2011

संदीप खरे - सांग सख्या रे

प्रेमात तिच्याबद्दल बरेच काही लिहू शकतो आपण.. पण खरी भावना तिच्यावरचे खरे प्रेम हि ती गेल्यावरच समझते... मग या निसर्गाच्या पसार्यात ही मग फक्त तीच दिसते... आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग फक्त तिचाच शोध सुरु होतो अगदी तिच्यावर लिहलेल्या कवितेतही... अशीच एक संदीप खरे यांची कविता..       


या गाण्याच्या lyrics  साठी कृपया खालील लिंक वर क्लिक  करा...
सांग सख्या रे | sang sakhya re lyrics

21 Nov 2011

आयुष्यावर काही

आयुष्यावर तसे बऱ्याच कविता लेख लिहले गेले आहेत. पण तरीही हे आयुष्य एवढे काही शिकवत असते की त्यावर किती लिहले तरी कमीच आहे असे वाटते... माणूस जन्माला आल्यावर त्याने नक्की कसे जगायचे किवा त्याला कसे जगायचे आहे हे फक्त त्यालाच माहित असते.. अशीच माझी एक कविता कि मला कसे जगायचे आहे... आणि आयुष्याच्या शेवटी आपल्याला काय मिळणार आहे... मला खात्री आहे तुम्हाला आवडेल..

आयुष्य... 

तुझ्यावर काव्य करताना..

आपल्या प्रेयसी वर कविता करताना एखादी व्यक्ती किती भावनेत वाहून गेलेली असते... मग तिच्यावर कविता करताना शब्दानाही तो अचूकपणे निवडत असतो कारण शब्दानेही तिला छेडावे हे त्याला मान्य नसते अशीच एक कविता मला वाचताना सापडली मला खात्री आहे तुम्हाला ही आवडेल...
खट्याळ शब्द.. 

17 Nov 2011

Hindi shyari 1

दिलको कितना समझाते हे  पर समझा नहीं पाते,
उनको भुलाना चाहते हे  पर भुला नहीं पाते,
ए दिल चले गये हे वो  अपने जिंदगी से,   
फिर भी क्यो हम उनके बिना जी नहीं पाते... 

Hindi Shyari..

आजकाल निंद क्या हे वो भूल गये हे हम,
आपकी यादो मे कुछ  इस तऱ्ह से खो गये हे हम,
रुथ न जन हमसे  कभी ए जानेमन,
आपकी आंखो मी हमारी जिंदगी देखते हे हम...!!!!  
सुशांत बनकर.  
     

माझ्या शब्दांची तू....

प्रेम म्हणजे नक्की तरी काय? प्रेम म्हणजे एखाद्याच्या आठवणीत स्वतःला विसरणे, त्याच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण आठवणे, मग ती गेल्यावर तिच्यासाठी शब्दांना कवितेत बांधणे... पण शेवटी ती सोबत नाही म्हणून अखेर त्याच शब्दांना आणि कवितेला झुगारून देणे... अशीच माझी एक कविता----

तू आणि शब्द 

15 Nov 2011

दोन मित्र...

एकदा  दोन  मित्र ,१  हिंदू  आणि  दुसरा  मुसलमान , रस्त्याने  बरोबर  चालले  असतात.
 तेवढ्यात, त्यांना  रस्त्यात  वीस (20) रुपयाची  नोट   दिसते .
मुसलमान  मित्र  एकदम  excite होऊन  म्हणतो ,
"बीस  मिल्हा!!"
त्यावर  हिंदू  मित्र  चिडून  मानतो ,
 "दस   तुला , दस   मला !!!!!"

हास्यरंग | Marathi Jokes  

इतकी नाजुक इतकी आल्लाड.. - संदीप खरे

इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार

इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक

कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला

इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक

इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते

इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे

संदीप खरे - सलील कुलकर्णी | Sandip Khare - Salil Kulkarni 

तुझे नि माझे नाते काय ? - संदीप खरे



अल्बम :- सांग  सख्या  रे 
तुझे  नि  माझे  नाते  काय ?...
तू  देणारी  मी ... मी  घेणारा
तू  घेणारी ... मी  देणारा
कधी  न  कळते  रूप  बदलते
चक्राचे  आवर्तन  घडते
आपुल्यामधले  फरक  कोणते ?
अन  आपुल्यातून  समान  काय ?....

मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...
सुंदर  स्वप्ने  पडत  असतील ,
पण  कुशीवर  वळेल... उसासेल...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल
तिच्यासमोरही   तेच  ढग .. जे  माझ्यासमोर !
तिच्यासमोरही  तेच  धुकं .. जे  माझ्यासमोर !
तिचे  माझे  स्वल्पविरामही  सारखे  अन  पूर्णविरामही !
म्हणून  तर  मी  असा  आकंठ  जागा  असताना
तिचीही  पापणी  पूर्ण  मिटली  नसेल ...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...

सुखादुखाची  होती  वृष्टी
कधी  हसलो, कधी  झालो  कष्टी
सायासावीन  सहजची  घडते
समेस  येता  टाळी  पडते!
कुठल्या  जन्मांची  लय  जुळते ?
या  मात्रांचे  गणित  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय  ?...

बगीचे  लावले  आहेत  आम्ही  एकत्र ... एकाकी
माती  कळवली  आहे  आम्ही  चार  हातानी
नखात  माती  आहे  आम्हा  दोघांच्या ...अजूनही
मनात  फुला  आहेत  आम्हा  दोघांच्या ... अजूनही
दोघांच्याही  हातावर  एकमेकांच्या  रेषा   आहेत  !
दोघांच्याही  ओठांवर   एकमेकांच्या  भाषा  आहे  !
रात्री  होऊन  जाईल  चंद्र  चंद्र  आणि  मी  जागाच  असेन ;
तेव्हा  बर्फाच्या   अस्तराखाली  वाहत  राहावी  नदी
तशी  ती  ही  जागीच  असेल ...
मला  खात्री  आहे  तिलाही  झोप  आली  नसेल...

नात्याला  या  नकोच  नाव
दोघांचाही  एकच  गाव !
वेगवेगळे  प्रवास  तरीही
समान  दोघांमधले  काही  !
ठेच  लागते  एकाला
का  राक्तले दुसर्याचा  पाय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय  ?...

संदीप खरे - सलील कुलकर्णी | Sandip Khare - Salil Kulkarni  

14 Nov 2011

भावना..

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस कारण तो काही क्षणांचा असणार आहे,
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस कारण एक दिवस त्याची राख होणार आहे,
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे,
कारण त्या जर तू समजलीस तर मी सदैव तुझ्यासोबतच असणार आहे...!!!       

सुशांत बनकर. 

चारोळी 

एक मुलगी..

एक मुलगी तिचा स्वतःचा नं. तिच्या BF च्या मोबाईल मधून डायल करते, हे बघण्यासाठी कि त्याने तिचा नं. काय नावाने सेव केलाय ......जस.. ..बाहुली , शोना...

आणि तिला धक्काच बसतो.

ते नाव असत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तुकाराम प्लंबर.

हास्यरंग | Marathi Jokes

रात्रीतली तुझी आठवण...!!!!

रात्रीचा चंद्र आणि चांदण्यांची रात्र,
आणि या रात्रीच्या सोबतीला तुझ्या आठवणींचे सत्र,
मग कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर झुलत राहयचे,
आणि डोळे घट्ट मिटून फक्त तुला आठवत राहयचे,
झोप येत नाही म्हणून खिडकीत उभे राहयचे,
आणि आकाशातल्या चमचमणाऱ्या प्रत्येक ताऱ्यात पुन्हा तुलाच शोधू पहायचे,
या प्रत्येक ताऱ्यात तुझे बहुरूप अनुभवायचे,
आणि हा तर माझा तो तर माझा करत प्रत्येक ताऱ्याला आपले करायचे,
मग हळूच नजर त्या चंद्राकडे फिरवायची,
आणि अबोल अश्या त्या चंद्राकडे फक्त तुलाच मागायचे,
दिवस तर कशाही सरतो,
पण माझी प्रत्येक रात्र मी अशीच काहीशी जगतो,
कधी या चंद्र ताऱ्यांकडे रोज तुला मागायचे,
तर कधी तुझ्या आठवणीत स्वतःशीच काही तरी पुटपुटआयचे,
आता फक्त दोनच इच्छा मनात आहेत,
एकतर पुन्हा तुझा होऊन तुझ्यासाठी जगायचे,
नाहीतर कधी ही न संपणाऱ्या या रात्रीत रोज स्वतःला मरताना पहयाचे..!!!!

सुशांत बनकर.           

तू आणि शब्द...!!!!