25 Aug 2012

माझी आई

शब्दांनीही मुजरा करावा अशी थोर तिची पुण्याई..
शब्दांनीही मुजरा करावा अशी थोर तिची पुण्याई..
विचारलं मजला कोण प्रिय उत्तर असेल माझी आई...!!!

सुशांत बनकर.

8 Feb 2012

विचार बदला म्हणजे मत बदलेल..

नमस्कार मित्रानो आज बर्याच दिवसांनी काही तरी लिहावेस वाटले.. निम्मित सापडले ते १६ फेब्रुवारीला असणाऱ्या निवडणुकांचे.. निवडणुका म्हणजे जुगार झाला आहे.. आणि यावरूनच मला आज एक कविता करावीशी वाटली.. मित्रानो आपले मत हे खूप बहुमोल आहे त्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून देऊन आपल्याला हवा असलेला महाराष्ट्र घडवणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते.. मी आशा करतो की माझी ही कविता आपल्याला योग्य उमेदवार निवडून देण्यास मदद करेल..






     

कोण म्हणतो आमचा हात आम आदमी के साथ..
कोण म्हणतो आमचे घड्याळ २४ तास फक्त तुमच्यासाठी,
कोण म्हणतो भगवा घ्या  हाती,
तर कोण म्हणतो आमचे इंजिन नवनिर्माणासाठी...
  

27 Jan 2012

कोरीव चेहरा तव घडवून कोण गेले - निशिकांत देशपांडे ( मराठी मंच )

निशिकांत देशपांडे यांची एक अप्रतिम गजल.. 
कोरीव चेहरा तव घडवून कोण गेले?
नक्षत्र तेज वदनी मढवून कोण गेले?

डोळे तुझे नशीले अंदाजही नशीला
बेहोष धुंद डोही बुडवून कोण गेले?

ते धुंद हास्य ओठी खैरात मज नशेची
मायूस आज का तू चिडवून कोण गेले?
ह्या गजलेचा आनंद घेण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा..  
निशिकांत देशपांडे यांची एक अप्रतिम गजल.. 

 

18 Jan 2012

बेचिराख झालो मी - संकेत शिंदे (मराठी मंच )

भारतीय संस्कृती आणि तिझा दांडगा अभिमान याच गोष्टींवर आपण आजही प्रत्येक अपयशाला सामोरे जातो. उगाचच नको त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचा उद्धार होतो! पण खरच आपण आपली संस्कृती जपली आहे का? ती वाढवली आहे का? ऋषी, मुनी, विज्ञानी यांनी १० हजार वर्षांपूर्वी घडवलेला भारत खरच का आज त्यावेळेहून प्रगत आहे? नाही, नक्कीच नाही संपत्तीच्या हव्यासापोटी आणि परकियांच्या अनुकरणाने आपण आपलीच संस्कृती भ्रष्ट केली आहे. असलेल्या पोथी, पुराणांवर आपण कधी विश्वास टाकलाच नाही आणि ढोंगी, पाखंडी बाबांमुळे परम सिद्धी प्राप्त अश्या सत्पुरुषांवर अजब हालाखी ओढावली. संस्कृतीचा अभ्यास, तिला विस्तृत करण दूर राहील पण आपल्याला तिझ संवर्धन, जतनही नाही करता आल. परिस्थिती आज अशी आहे कि परदेशी भक्त मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. एका बाजूने मानसिक हल्ला करत "भारतीयांना संस्कृतीच नाही" आणि जी आहे ती हल्ली म्हणजे २ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, अशी वक्तव्य करायची आणि मुळात आपल्याच घरात येऊन आपलेच योग, साधना शिकून आपल्या देशांचा उद्धार करायचा असा चंग त्यांनी बांधला आहे. भारतीय कधी या मुद्द्यावर प्रकाश टाकणार देवास ठाऊक...! 

-------------------------------------------------------------------------------------------------------

बेचिराख झालो मी, वेदनांचा धनी
शाश्वत सत्याकडे का हर एक पाठ फिरवी?
कोण धुंदीत फिरते जग सारे?
जळणाऱ्या स्फटिकांना म्हणून तारे...!

सज्जन, सात्विक, निस्वार्थी ईश्वराचा अंश
आपुल्यातही साचलाय तो म्हणे मानव वंश!
स्वार्थावर होऊन स्वार, संपत्ती संचय सदैव
निर्जीव, निश्चल, निरर्थक दगडात बांधला देव

16 Jan 2012

शाळा - मराठी चित्रपट

प्रेम.......
प्रेम मोकळ असत का? की खरच त्याला काही बंधन असतात.
वेळेच बंधन असत का त्याला?
रोज रोज दिसणारे ते चेहरे आणि त्याच्याबरोबर लहाणाचे मोठे झालेलो  आपण , अचानक एके दिवशी पोरके होतात , एकदम अचानक..........
अचानक रस्ते वेगळे होतात ,ध्येय वेगली होतात
आणि मग प्रवास सुरु होतो ..... एकट्याचा.
अशा या समाजात वावरत असताना आणि ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करत असताना या एकट्या अशा प्रवासाला काही पर्याय असू शकतो का ?
हा प्रवास करत असताना आपण खरच मोकळेपणाने तो करत असतो का ?

शाळा- या सर्वांवर भाष्य करतो आणि कदाचित त्याच्या पल्याडही......


शाळा या चित्रपटाचे सर्व ट्रेलर पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा..   






13 Jan 2012

रतनगड ट्रेक एक वेगळा अनुभव (संकेत शिंदे - मराठी मंच)

काय मग ३१ डिसेंबरला मस्त धमाल केली असेल .. माझा ३१ डिसेंबर काहीसा वेगळ्या प्रकारचा होता फक्त मोजक्या मित्रांसोबत आणि निसर्गाच्या आपल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या सोबत.. विचित्र वाटत असेलना पण असाच काहीसा होता.. ट्रेकिंग ही गोष्ट पहिल्यापासून आवडीची म्हणून या वेळेस मुंबई मध्ये राहून धिंगाणा घालण्यापेक्षा विचार केला कुठेतरी लांब जावे जिथे कोणीच नसेल... निसर्ग,  मी आणि माझे काही मोजके मित्र.. आणि त्यासाठी आम्ही निवडला तो रतनगड..  असाच आमचा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल.. संकेत शिंदे या माझ्या एका मित्राने लिहिलेल्या या लेखात आम्ही केलेली धमाल मस्ती आणि याव्यतिरिक्त या गडापर्यंत असलेला प्रवास तुम्ही कशाप्रकारे करू शकता याबद्दलची थोडी माहिती.. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल..  
-------------------------------------------------------------------------------------------------------

सप्तर्षी हा माझा सर्वात जवळचा मित्र परिवार. नावावरून लक्षात आलंच असेल कि हा ग्रुप सात जणांचा आहे. पंकज बावदाणे, ओंकार फडणीस, प्रदीप चौधरी, सुमित ताटे, सुशांत बंकर, स्वप्नील कर्णे आणि मी संकेत शिंदे हे या ग्रुपचे सदस्य. शिवरायांविषयी आस्था आणि सह्याद्रीत फिरण्याच्या हौसेपोटी दरवर्षी कमीत कमी एका तरी गड किल्ल्याला आम्ही भेट देतो.

पुढे वाचा.. 





9 Jan 2012

आई - निशिकांत (मराठी मंच)

नमस्कार मित्रानो आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा मराठीसाठी थोडा वेळ देता आला.. कामाच्या धावपळीत आठवढाभर वेळच देता आला नाही.. आणि सुदैवाने माझ्या वाचनाची सुरवात झाली ती आई या कवितेने.. आई या शब्दातच जणू सारे जग सामावले आहे असे भासते.. भासते कसले दिसतेच म्हणाना.. लहान असताना प्रत्येक मुलाला जवळ हवी असते ती आई.. पण मोठे झाल्यावर का बरी अशी चित्रे बदलतात याचाच विचार मनात येतो.. माणसे मोठी झाल्यावर बदलतात हे जितके खरे आहे तसेच मुलगा कितीही मोठा झाला तरी आईच्या स्वभावात काडी मात्र बदल होत नाही हेही तितकेच खरे आहे.. अश्याच बदलणाऱ्या या मुलांवर लिहलेले  एक वास्तवादी सत्य या कवितेतून मला दिसून आले.. निशिकांत यांनी खूप छान प्रकारे हे सत्य मांडले आहे.. प्रत्येकाने ही कविता नक्की वाचा... मला खात्री आहे आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल..    

भांडत होतो खूप खूप
मी आणि भाऊ
भांडणाचं कारण नव्हतं
आईनं दिलेला खाऊ

कारण एकच एक होतं
आठवण अजून ताजी
तो म्हणे आई त्याची
मी म्हणे माझी



3 Jan 2012

पाचोल्याचा आवाज - अंकिता (मराठी मंच)

प्रेमात काही गोष्टी कधीच विसरता येत नाही.. आणि जर सगळ्या गोष्टी माणूस विसरला तर ते प्रेम कसले.. प्रेमात जगलेला प्रत्येक क्षण हा एक वेगळा अनुभव देऊन जात असतो आणि जेव्हा हे प्रेम दूर जाते तेव्हा मात्र ते आठवणींची चादर पांघरायला देऊन जात असते.. मग नकळत या आठवणीत माणूस हरवून जातो आणि त्यानंतर अनुभवणारी प्रत्येक गोष्ट जणू त्यास ओळखीची वाटत असते.. त्या वाटा, तो पाऊस, तो समुद्र किनारा, आणि राना वनातून भटकताना पायाखाली दबलेल्या तो पाचोल्याचा आवाजही ओळखीचा वाटतो..  अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली जी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल..    

-----------------------------------------------------------------------------------------------------

पाचोल्याचा आवाज
खूप काही सांगून जातो
क्षणभर का होईना ओळखीचा  वाटतोय ..........

2 Jan 2012

म्हटलं आज एक खेळ मांडूया

माणसाच्या आयुष्यात शब्दांना फार किमत असते.. म्हणून प्रत्येकजण शब्द जपून वापरतात.. प्रेम करणाऱ्याला तर शब्द वापरणे हे एका लढाईप्रमाणे असते.. स्तुती करतना शब्दांची योग्य ती निवड करावी लागते आणि भांडताना तर प्रत्येक शब्द निरखून मग तो वापरावा लागतो.. जेव्हा अश्या शब्दात प्रेम जुळते तेव्हा सुरु होतो शब्दांचा खेळ.. मग या शब्दात रुसणे - हसणे, हरणे - जिंकणे सगळ्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या जातात.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली जी मला तुमिच्यासोबत शेअर करायला आवडेल.. मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडेल..            

-------------------------------------------------------------------------------------------------------

 म्हटलं आज एक खेळ मांडूया
शब्दांचा खेळ .......
खेळायला तुला बोलावाव अस वाटल
पण मलाच खेळ समझला नाही