1 Nov 2014

अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…

माझी कविता :-

अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…

रोजचाच प्रवास, रोजचीच गर्दी,
म्हटलं आज गर्दीतून थोडा बाहेर पडाव
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…

विचारात हरवलेले मन, मनात लपलेले निशब्द  भाव,
म्हटलं आज या भावनांना थोड आपलं  कराव,
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…

गुंतलेल्या आयुष्यात शब्दही  गुंतून पडलेले,
न भेटता वाट आज तेही मनात गुदमरले,
म्हटलं आज थोड या शब्दांनाही मोकळ  करावं ,
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…


आठवल सार काही आज एका  क्षणात,
अन पाणावलेले डोळे काही बोलेना,  
म्हटलं आज थोड या आठवणीतच भिजावं,
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…

ते सुखावणारे क्षण,
अलगद लागणारी मनाला ती ठेस,
आज सार काही आठवावं,
म्हटलं आज आपल्याच आयुष्याच पुस्तक जरा वाचव,
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं… 

आजची रात्र अशीच रहावी,
मी रात्रीशी, रात्र माझ्याशी थोडं  बोलावी,
म्हटलं आज या रात्रीलाच आपल मित्र कराव,
अन आज आपल्याच छंदाला ओ द्यावं…!!!

 सुशांत बनकर.