8 Feb 2012

विचार बदला म्हणजे मत बदलेल..

नमस्कार मित्रानो आज बर्याच दिवसांनी काही तरी लिहावेस वाटले.. निम्मित सापडले ते १६ फेब्रुवारीला असणाऱ्या निवडणुकांचे.. निवडणुका म्हणजे जुगार झाला आहे.. आणि यावरूनच मला आज एक कविता करावीशी वाटली.. मित्रानो आपले मत हे खूप बहुमोल आहे त्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून देऊन आपल्याला हवा असलेला महाराष्ट्र घडवणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते.. मी आशा करतो की माझी ही कविता आपल्याला योग्य उमेदवार निवडून देण्यास मदद करेल..






     

कोण म्हणतो आमचा हात आम आदमी के साथ..
कोण म्हणतो आमचे घड्याळ २४ तास फक्त तुमच्यासाठी,
कोण म्हणतो भगवा घ्या  हाती,
तर कोण म्हणतो आमचे इंजिन नवनिर्माणासाठी...