6 Dec 2011

सुखाचे क्षण..

नुकताच फेसबुकवर टाईमपास करत होतो आणि असेच बघता बघता काही ओळी नझरेस पडल्या. आणि त्या इतक्या  आवडल्या की शेअर केल्याशिवाय राहवलेच नाही. आयुष्य म्हणजे नक्की काय ? आपण कधी मनापासून या गोष्टीचा विचार केला आहे का? प्रत्येक माणूस हा सुखाच्याच मागे धावत असतो आणि सुख समोर असूनही काही वेळेस तो दुखला आपलेसे करत असतो. दुर्दैवाने मला हे जे कोणी लिहले त्याचे नाव नाही सापडले.. पण ज्यानीही लिहले आहे कदाचित त्यालाच माहित असावे की आयुष्य कसे जगावे.. मी आशा करतो की तुम्हाला आवडेल..        
आयुष्य हे चहाच्या कप सारखे असतं...
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात
अवती भोवती पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,,
अरेच्या! साखरच घालायला विसरलो कि काय...

... पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही
कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती,
कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर....

आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे...
 

No comments:

Post a Comment