6 Dec 2011

नो फेसबुक & ट्विटर????

नुकताच मटा च्या वेबसाईटवर बातम्या वाचत होतो आणि वाचता वाचता एका बातमीने लक्ष वेधून घेतले "फेसबुक ट्विटर वर केंद्र सरकारची करडी नझर" आता या बातमीवर हसावे की रडावे काहीच कळत न्हवते. एकीकडे तरुणांनी समाजात विलीन व्हावे यासाठी हे राजकारणी धडपडत असतात आणि जेव्हा फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरून जेव्हा हा तरुण जनजागृती करण्याचे काम करत असतो तेव्हा त्यांच्या या कामावर बंदी आणण्याचा विचार हे लोक करतात आणि हीच फार मोठी शरमेची बाब आहे. आणि यामागे कारण ही तसेच आहे कारण सध्याची वाढती महागाई आणि इतर सगळ्या ठिकाणांचे कॉंग्रेस सरकारचे प्रताप यामुळे गेल्या ३, ४ महिन्यात हेच कॉंग्रेस वाले बदनाम होत आहेत ना? मग स्वतःची बदनामी बघवत नाही त्यांना आणि त्यासाठीचे हे सर्व प्रताप चालू आहेत. पण या गोष्टी करून आधीच नझरेतून उतरलेले कॉंग्रेस सरकार आज आणखी नझरेतून उतरले आहेत. या अश्या गोष्टींवर करडी नझर ठेवण्यापेक्षा जरा देशावर लक्ष केंद्रित करा.. आणि योग्य मार्गाने कामे करा मग कोण कशाला तुम्हाला बदनाम करेल. तुम्ही जर चांगली लोकहिताची कामे केली तर नक्कीच आम्ही तरुण मंडळी तुम्हाला उचलून घेऊ.. पण अजूनही पोट ना भरलेले हे कसली चांगली कामे करणार.. पण तरीही कॉंग्रेस सरकारने हेच लक्षात घ्यावे की तरुणांच्या वाटेवर जाऊ नका.. तुमचे घाणरडे राजकारण तुम्ही तुमच्या विरुद्ध उभ्या असलेल्या पक्षाबरोबरच खेळा.. जर का हा तरुण भडकला तर तुम्हालाही माहित आहे काय होऊ शकत ते....

Source :फेसबुक, ट्विटरवर केंद्राची करडी नजर

सुशांत बनकर.             


No comments:

Post a Comment