2 Dec 2011

भटक्या मतदारांविरोधात राज ठाकरे..

नुकताच बातम्या पाहत होतो.. एक न्यूज पाहिली  राज ठाकरेंनी भटक्या मतदारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. ऐकून चांगले वाटले. कारण आज मुंबईमध्ये इतके रस्त्यवर राहणारे लोक आहेत की त्यांचा वापर हे राजकारणी बोगस मतदार म्हणून चांगल्या प्रकारे करून घेतात. एक १०० किवा ५०० रुपयांची नोट खूप होते या लोकांसाठी.. राज ठाकरे यांनी उचललेले हे पाऊल खरच स्तुतीजनक आहे. एवढेच न्हवे तर नेहमी पुरावे देऊन बोलणारे राज ठाकरे यावेळेसही पुराव्यासकटच बोलले. सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर रस्त्यावर झोपणाऱ्या एका बाईकडे पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, इतकेच न्हवे तर तिच्याकडे आधार कार्ड ही आहे. या सर्व गोष्टी पोस्टाने घरी येतात मग रस्त्यावरच्या बाईकडे या सर्व गोष्टी कश्या असा प्रश्न त्यांनी विचारला असून निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी असे ते म्हणाले. मुंबई मध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी सापडतील. माझ्यामते राज ठाकरेनप्रमाणे  इतर ही पक्षांनी हे पाऊल उचलायला हवे तेव्हा कुठे जाऊन या गोष्टी थांबतील आणि मीडियानेही या गोष्टीची दखल घेऊन अश्या गोष्टी कुठे होत असतील तर त्या लोकांच्या निदर्शनास आणून द्यायला हव्यात. असो यावरती नक्कीच काही तरी तोडगा निघेल अशी आशा करूया...      


सुशांत बनकर.

   

No comments:

Post a Comment