21 Dec 2011

असे जगावे

माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर नक्कीच या समाजासाठी काही तरी करावे असे मला वाटते.. नुसते जन्माला येऊन स्वतापुर्ता विचार करून जगण्यास काहीच अर्थ नाही असे मला वाटते..  आपल्या स्वप्ने पाह्नायचा अधिकार आहे आणि ती प्रत्येकाने पहावीच आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची एक जिद्द प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे असे मला वाटते.. तेव्हा जन्माला आलो आहे म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जन्माला आलो आहे यासाठी माणसाने जगावे.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा आहे.. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता नक्की आवडेल..     

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची

No comments:

Post a Comment