9 Dec 2011

क्रिकेट एक धर्म..

नुकतीच बातमी वाचली वीरेंद्र सेहवागला २५ लाखाचे बक्षीस घोषित केले गेले आहे.. ही खूप आनंदाची बाब आहे आणि केलेच पाहिजे.. शेवटी भारताचे नाव त्याने रोषण केले आहे.. तुम्हालाही वाचून आनंद झालाच असेल.. पण मला नाही झाला तितका.. क्रिकेट हा आपल्या भारतात एका  धर्मासारखा बनला आहे. या क्रिकेटर्सना ही अशी बक्षिसे दरवर्षी जाहीर होत असतात. आणि इतर खेळ भारतात खेळले जातात की नाही या बदल फार मोठी शंका निर्माण होते.. काही दिवसांपूर्वी महिला व पुरुष कब्बडी संघांनी विश्व कप  जिंकला त्यांना काय मिळाले.. वीरेंद्र सेहवागला एकट्याला जितकी रक्कम मिळाली असेल तेवढी त्या पूर्ण संघाना मिळाली असेल.. इतकेच न्हवे तर त्यांना आपापल्या घरी परतण्यासाठी वाहनांची सोय ही न्हवती या महान खेळाडूंनी अखेर रिक्षानी प्रवास केला आणि तरीही याबद्दल कुठेच आणि कसलाही आवाज उठला नाही.. मिडियावाले तर कोणत्या बातम्या दाखवत असतात ते त्यांनाच माहित इतर वेळेस शुल्लक कारणांवरून अर्ध्या अर्ध्या तासाच्या बातम्या बनवणारे हे लोक ही गोष्ट फक्त १० मिनिटे दाखवून संपवतात याचेच मोठे नवल वाटते... या गोष्टीवर आवाजही उठवला जातो पण पुढे काय होते तेच कळत नाही.. या मंत्र्यांना हे सांगावे लागते की आपल्या देशात क्रिकेट सोडूनही इतर काही खेळ खेळले जातात तेव्हा त्यांना जाग येते आणि मग काही रक्कम घोषित करून विषयच संपवतात..

आणि हे फक्त कब्बडी या खेळापुरतेच नाही आहे हॉकी, खो खो, अथेलेटिक्स, फूटबॉल या खेळांची ही हीच अवस्था आहे.. आपल्या महाराष्ट्रामधील एक महिला वेटलिफ्टर आहे तिचे वडील शेतकरी आहेत. त्या महिलेमध्ये एवढे गुण आहेत की तिची निवड ऑलम्पिकसाठी झाली आहे.. पण या सर्व गोष्टीना लागणारे सामान आणि प्रवास खर्च हा त्यांना परवडणारा नाही आहे.. मग या खेळाडूंचे भवितव्य काय आहे हाच प्रश्न निर्माण होतो आणि शासनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करते हीच मोठी दुखाची बाब आहे.. भारतीय खेळाडूंकडे नक्कीच गुणांची कमी नाही आहे फक्त कमी आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि सोयीसुविधांची.. या सोयीसुविधा जर यांना वेळच्या वेळी पुरवल्या गेल्या तर नक्कीच ओलम्पिक मध्ये पहिल्या ५ देशांच्या नावात एक नाव असेल ते म्हणजे "भारत". मी आशा करतो की क्रिकेटला जो न्याय मिळतो तो इतर  खेळांनाही लवकरात लवकर मिळेल..                            

  सुशांत बनकर.  

No comments:

Post a Comment