12 Dec 2011

या दारूची नशा काही वेगळीच असते...

दारू प्यालेल्या माणसांना आपण सर्वांनी पहिलेच आहे, खूप मजा येते अशा माणसांना पाहायला.. हा झाला गमतीचा भाग पण तुम्हीही कधी दारू प्यायलाच असाल, नसाल प्यायला तर चांगलीच गोष्ट आहे... पण आजकाल कामाचा व्याप एवढा वाढला आहे की प्रत्येक माणसाला आठवड्यातून एकदा का होईना या थकव्यासाठी टोनिक लागतेच.. आणि मग सुरु होतात त्या गमतीदार गप्पा ऑफिस, प्रेम, मैत्री या सर्व गोष्टीवर चर्चा होते.. आणि आठयाभारचा थकवा थोडा का होईना कमी तर नक्कीच झालेला असतो.. अशीच एक माझी कविता मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल.. मी आशा करतो की ही कविता तुम्हाला आवडेल..            

या दारूची नशा काही वेगळीच असते,
आठवध्याभराच्या थकव्यानंतर शनिवारची रात्र येते,
आणि मग मित्राची मेहफिल जमते,
आणि timepass म्हणून दारू तर नकीच कंपनी  देते,
सोडा कम ३०-३० ने सुरवात होते,
आणि दोन घोट उतरल्यावर खऱ्या विषयांना सुरवात होते,
मग बॉसला शिव्या घालण्यातच ३० ची नशा उतरू लागते,
आणि महत्वाच्या विषयांवर यायला ६० ची गरज भासू लागते,
प्रेमावर बोलायला तर सगळेच शहाणे तयार असतात,
कारण आपल्यासारखे  प्रेम कोणीच केलेले नसते,
मग दारू बोलते कि माणूस हेच कळत नसते,
पण यात ती मुलगी मात्र नक्कीच बदनाम झालेली असते,
प्रेमाच्या विषयात ६० कधी संपते हेच कळत नाही,
मग तिला विसरण्यासाठी फिनिशिंग ६० ची गरज भासू लागते,
ही ६० उतरल्यावर विषयांना काहीच जागा नसते,
आणि कोणाचा आवाज मोठा याचीच स्पर्धा सुरु असते,
मग यात तर कोण बदनाम होत आहे याचेही भान नसते,
कारण आता माणसाची जागा दारू ने घेतलेली असते,
आठवध्याभराच्या थकव्याला एक टोनिक मिळालेले असते,
खरच या दारूची नशा आणि यातून होणारी माणसाची दशा  काहीशी वेगळीच असते...!!!!     

सुशांत बनकर.  



No comments:

Post a Comment