8 Dec 2011

क्षितीज...

माणसाची स्वप्ने खूप मोठी असतात आणि असावीच कारण त्यासाठीच तर आपण जन्म घेतला आहे.. आयुष्यात नेहमी एक ध्येय असावे, लांब पल्ला गाठण्याची एक जिद्द असावी.. जर आयुष्यात हे ध्येय नसेल तर माणूस म्हणून जन्माला येऊन काहीच अर्थ नाही. आणि नुसते ध्येय ठेवूनही काही उपयोग नसतो कारण ते ध्येय गाठण्यासाठी लागते ती जिद्द.. आज एक कविता वाचनात आली.. खरच साध्या शब्दातली कविता आहे तरीही मनात एक विश्वास जागवणारी आहे.. आपल्या सर्वांसमोर एक ध्येय आहे आणि हे कविता ते ध्येय गाठण्याचे बळ आपल्याला देते.. मी आशा करतो की तुम्हाला आवडेल...          

क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते..
जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.
कारण त्याला आपण गाठायचे असते..
एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते,
आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते.
पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते..
तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते,
क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते..
त्याला आपण गाठायचे असते..

कवी - अपरिचित



1 comment: