7 Dec 2011

फिर से मुझे स्कूल - SAY BAND

शाळा कोणाला नाही आवडत? आपल्या सगळ्यांनाच आवडते. कितीही मोठे झालो तरी शाळेतले दिवस विसरू शकत नाही.. आयुष्यातले पहिले मित्र इथेच भेटतात. पहिले प्रेमही इथेच होते. एवढेच न्हावे तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या शाळाच शिकवते.. शाळेत होतो तेव्हा कधी कॉलेजला जाणार असा विचार असायचा आणि मग कॉलेजला गेल्यावर आपली शाळाच बरी होती असे वाटायचे... खरच आजही तुम्ही शाळेतले काही मित्र भेटत असाल आणि आठवत असाल ते शाळेतले दिवस.. आठवत असाल उगाचच केलेली ती भांडणे आणि आठवत असाल ४ , ५ जणांनी खालेला तो एकच वडापाव.. असेच एक say band चे गाणे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे गाणे ऐकले ही असेल पण तरीही शाळेतली मजा काही वेगळीच होती तेव्हा शाळेत केलेल्या त्या मजा मस्तीला पुन्हा एकदा आठवण्यास काहीच हरकत नाही..

 
वर्गांच्या बाकांवर नाव लिहिलेली
शाळेच्या बस मध्ये मस्ती  केलेली
कॉलेजला मस्तीची होतात लफडी
नावांच्या जागेवर प्रेमाची कोडी
स्कूल मी रोजाना जाने का अलग था मजा
फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा

शाळेचा पहिला  दिवस आठवतो
पावसाने भिजलेले रस्ते
आणि शाळेत जायचा म्हणून भिजलेले डोळे
सगळं काही नवीन नव्या बाई नवा वर्ग
धावत जाऊन पकडलेला मागचा बेंच
आणि मागच्या बेंचवरुन पाहिलेली
पोर... पहिल्या रोची वही खरडत बसणारी
मागे सगळे अवली त्यांच्या वह्या चोरणारी
कॉलेजमधे सारे बेधुंद वारे
क्लासरूम मधे टीचर कट्यावर सारे
टीचर कि वो दात खा लेने दो दोबारा
फिर से मुझे स्कूल मी जाने दोना जरा
ए भइ..पहिली पकडलेली कॉलर
पहिला दिलेला धक्का
मोठ्यांमध्ये राहून खूप वेळेला ऐकलेली
शिवी.... पहिली वाहिली थोडीशी अडखळलेली
पोरींनी केली चुगली पण मित्रांनी तारीफ केली
कॉलेजला आई बहिणीं झाल्या विदेशी
शिव्यांची स्पर्धा हि पोरा पोरींची
पेहली गाली का वो बचपन चला हि गया
फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा 

प्रार्थना हि शाळेतच म्हंटली जायची
रिकाम्या जागा भरा जोड्या लावा
हे प्रश्न शाळेत किती सोपे वाटायचे
पण आता काय सविस्तर उत्तरे द्या शास्त्रीय करणे द्या
अरे हा!... प्रश्न आले कि आठवते
परीक्षा ती शेवटची शेवटची ठरलेली
प्रश्नालाही त्या शेवटच्या शाळाही सरलेली
कॉलेजला  होतात पासिंग चे झोल
भरवल्या  छड्यांना घंटेचे टोल
जब छोटा था कितना प्यारा था जहां
लागता ही क्यू मुझको मै यू बडा हो गया
 फिर से मुझे स्कूल  मे जाने दोना जरा
      

No comments:

Post a Comment