13 Dec 2011

आताशा असेहे मला.....

माणसाच्या आयुष्यात दुख तर खूप असतात पण प्रत्येक जन हे दुख विसरून पुढचे आयुष्य जगात असतो.. पण कधी कधी आयुष्यात असेही क्षण येतात ज्यावेळेस काही जुन्या आठवणी मनावर ताबा घेतात आणि तेव्हा नकळत त्या आठवणीत डोळे कधी भरून येतात तेच कळत नाही.. मग का कुणास ठाऊक पुन्हा त्याच क्षणांची त्याच दिवसांची हे मन पुन्हा मागणी करत असते.. खरच  आयुष्यात जगलेले क्षण पुन्हा हवेच असतात पण ते शक्य नसते, पण मग तरीही का बरे हे मन  त्या क्षणांच्या मागे धावत असते.. खरच सलीलच्या आवाजातले हे गाणे मला नेहमी ह्याच प्रश्नात पाडत असते ज्याचे उत्तर मला अजून पर्यंत मिळाले नाही.. पण तरीही जेव्हा ही मी माझ्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांची आठवण करत असतो तेव्हा मी न चुकता हे गाणे ऐकतो.. कारण आयुष्यात कधी तरी कोणासाठी रडण्यास काहीच हरकत नाही असे मला वाटते.. खरच हे गाणे तुमच्याही मनात  कुठे तरी दडलेल्या जुन्या आठवणीना जागवत असेल ना????    



आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते , आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते , बरा  बोलता  बोलता  स्तब्द्ध  होतो 

कशी  शांतता  शून्य  शब्दात  येते, आताशा  असेहे  हे मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते

कधी  दाटू  येत  पसारा  घनांचा, कसा  सावळा रंग  होतो  मनाचा
असे  हलते  आत  हळूअव्र  काही
जसा  स्पर्श  पाण्यावरी  चंदनाचा
आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते

असा  ऐकू  येतो  क्षणांचा   इशारा
शनी  वर्थ  होतो  दिशांचा  पसारा
नभातून  ज्या  रोज  जातो  उडोनी
नभाशीच  त्या  मागू  जातो  किनारा
आताशा  असेहे  मला  काय  होते
कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते
न  अंदाज   कुठले  न  अवधान  काही
कुठे  जायचे  यायचे  भान  नाही
जसा  गंध  निघतो  हवेच्या  प्रवासात
न  कुठले  नकाशे  न  अनुमान  काही
कशी  हि  अवस्था  कुणाला  कळावी , कुणाला  पुसावी  कुणी  उत्तरावी
किती  खोल  जातो  तरी  तोल  जातो , असा  तोल  जाता  कुणी  सावरावे
आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे  पाणी  डोळ्यात  येते
बरा   बोलता  बोलता  स्तब्द्ध  होतो
कशी  शांतता  शून्य  शब्दात  येते
आताशा  असेहे  मला  काय  होते , कुण्या  काळाचे  पाणी डोळ्यात  येते..!!!!


No comments:

Post a Comment