15 Dec 2011

नसेन मी जेव्हा - संकेत शिंदे(मराठी मंच)

आज तुमच्या आयुष्यात माणसांचा पसारा असेल.. काही जण तुमची स्तुती  करत असतील आणि काही जण मागून बोलत असतील.. हे असेच असते याबद्दल वाद नाही..  पण तरीही कधी विचार केला आहे.. तुम्ही गेल्यावर काय चित्र असेल तुमच्याबद्दल याच लोकांच्या मनात... ज्यांनी आयुष्युभर तुमची साथ दिली त्या व्यक्तींची अवस्था ती काय  असेल.. तुमचे मित्र, प्रेयसी किवा बायको, तुमचे नातेवाईक.. कशी होईल त्यांची अवस्था जेव्हा तुम्ही नसाल.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली.. नसेन मी जेव्हा.. संकेत शिंदे यांनी लिहलेली ही कविता खरच खूप अप्रतिम आहे.. क्षणभर विचार करायला लावणारी आहे..              

नसेन मी जेव्हा...
वारा वाहील तेव्हाही होऊन वेडापिसा
कोसळणाऱ्या पावसाचा नसेल भरवसा
समुद्राच्या उधाणाला तोड नक्कीच नसेल
कोणास ठाऊक  तेव्हा मी कोणत्या वेशात असेन?






No comments:

Post a Comment