कारण खरच ती अशीच आहे,
कारण खरच ती अशीच आहे,
कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर
अश्या नाजूक फुलपाखरासारखी ती आहे,
कधी रोज येणाऱ्या नवीन स्वप्नातल्या परीसारखी ती आहे,
तर कधी स्वप्न पूर्ण करणाऱ्या आशेसारखी ती आहे,
खरच कोणीच सांगू शकत नाही नक्की ती कशी आहे,
कारण खरच ती अशीच आहे..
प्रत्येकाला आवडेल असे एक वेगळेपण तिच्यात आहे,
पण प्रत्येकाला सतावेल असा हट्टीपणा हि तिच्यात आहे,
दुसर्यांसाठी जगण्याची एक अनोळखी कला तिच्याकडे आहे,
कारण खरच ती अशीच आहे..
चंद्रासारखे अबोल तिचे हसणे आहे,
आणि पावसाच्या पडणार्या शुद्ध ठेम्बंसारखे तिचे रडणे हि तितकेच खरे आहे,
यात वेगळेपण म्हणजे जीवनाला ही हवे हवे से वाटणारे एक सुंदर मन तिच्याकडे आहे,
कारण खरच ती अशीच आहे..
कुणास ठाऊक नक्की ती कुठे आहे,
माझी नजर अजूनही वेड्यागत तिला शोधते आहे,
रोज अशीच ती माझ्या स्वप्नात येऊन मला सतावत आहे,
का कुणास ठाऊक पण खरच ती अशीच आहे..!!!!
No comments:
Post a Comment