25 Feb 2015

नजरेचा खेळ

नजरेचा खेळ
नजरेचा हा खेळ न तुला कळला न मला कळला,
कॉलेजचा पहिला दिवस माझी नजर तुझ्या नजरेस मिळाली,
आणि त्याच दिवशी तू माझी नसताना ही माझीच झाली,
मग हळू हळू दिवस सरत गेले आणि हा नजरेचा खेळ असाच चालू राहिला,
माझी नजर रोज तुला काही तरी सांगत होती,
आणि मग तुझी नजर आपोआप झुकत होती,
नजरेत प्रश्न खूप होते पण त्यांची उत्तरे सापडत न्हवती,
कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुझ्या नजरेतच  कुठे तरी दडली होती,
कधी तुझी हीच नजर मला पाहताच हसत होती,
तर कधी तुझी हीच नजर मी न दिसल्यास रागवत होती,
कदाचित दोघांच्याही नजरेत एक प्रेमाची आशा दडली होती,
आणि ती नजरेतूनच कळावी हीच दोघांची इच्छा होती,
मग कधी तुझी नजर जुकायची, हसायची, रागवायची, आणि रोज काही तरी नवीन सांगायची,
आणि मला याच गोष्टींची गम्मत वाटायची,
कारण शेवटी माझ्या नजरेला तुझ्याच नजरेची भाषा कळायची,
परंतु अखेर हा नजरेचा खेळ अबोलच राहिला,
आणि नजरेतला खेळ शेवटी नजरेतच हरवला,
खरच नजरेचा हा खेळ न तुला कळला न मला कळला...!!!!

No comments:

Post a Comment