9 Jan 2012

आई - निशिकांत (मराठी मंच)

नमस्कार मित्रानो आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा मराठीसाठी थोडा वेळ देता आला.. कामाच्या धावपळीत आठवढाभर वेळच देता आला नाही.. आणि सुदैवाने माझ्या वाचनाची सुरवात झाली ती आई या कवितेने.. आई या शब्दातच जणू सारे जग सामावले आहे असे भासते.. भासते कसले दिसतेच म्हणाना.. लहान असताना प्रत्येक मुलाला जवळ हवी असते ती आई.. पण मोठे झाल्यावर का बरी अशी चित्रे बदलतात याचाच विचार मनात येतो.. माणसे मोठी झाल्यावर बदलतात हे जितके खरे आहे तसेच मुलगा कितीही मोठा झाला तरी आईच्या स्वभावात काडी मात्र बदल होत नाही हेही तितकेच खरे आहे.. अश्याच बदलणाऱ्या या मुलांवर लिहलेले  एक वास्तवादी सत्य या कवितेतून मला दिसून आले.. निशिकांत यांनी खूप छान प्रकारे हे सत्य मांडले आहे.. प्रत्येकाने ही कविता नक्की वाचा... मला खात्री आहे आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल..    

भांडत होतो खूप खूप
मी आणि भाऊ
भांडणाचं कारण नव्हतं
आईनं दिलेला खाऊ

कारण एकच एक होतं
आठवण अजून ताजी
तो म्हणे आई त्याची
मी म्हणे माझी



No comments:

Post a Comment