13 Jan 2012

रतनगड ट्रेक एक वेगळा अनुभव (संकेत शिंदे - मराठी मंच)

काय मग ३१ डिसेंबरला मस्त धमाल केली असेल .. माझा ३१ डिसेंबर काहीसा वेगळ्या प्रकारचा होता फक्त मोजक्या मित्रांसोबत आणि निसर्गाच्या आपल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या सोबत.. विचित्र वाटत असेलना पण असाच काहीसा होता.. ट्रेकिंग ही गोष्ट पहिल्यापासून आवडीची म्हणून या वेळेस मुंबई मध्ये राहून धिंगाणा घालण्यापेक्षा विचार केला कुठेतरी लांब जावे जिथे कोणीच नसेल... निसर्ग,  मी आणि माझे काही मोजके मित्र.. आणि त्यासाठी आम्ही निवडला तो रतनगड..  असाच आमचा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल.. संकेत शिंदे या माझ्या एका मित्राने लिहिलेल्या या लेखात आम्ही केलेली धमाल मस्ती आणि याव्यतिरिक्त या गडापर्यंत असलेला प्रवास तुम्ही कशाप्रकारे करू शकता याबद्दलची थोडी माहिती.. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल..  
-------------------------------------------------------------------------------------------------------

सप्तर्षी हा माझा सर्वात जवळचा मित्र परिवार. नावावरून लक्षात आलंच असेल कि हा ग्रुप सात जणांचा आहे. पंकज बावदाणे, ओंकार फडणीस, प्रदीप चौधरी, सुमित ताटे, सुशांत बंकर, स्वप्नील कर्णे आणि मी संकेत शिंदे हे या ग्रुपचे सदस्य. शिवरायांविषयी आस्था आणि सह्याद्रीत फिरण्याच्या हौसेपोटी दरवर्षी कमीत कमी एका तरी गड किल्ल्याला आम्ही भेट देतो.

पुढे वाचा.. 





No comments:

Post a Comment