18 Jan 2012

बेचिराख झालो मी - संकेत शिंदे (मराठी मंच )

भारतीय संस्कृती आणि तिझा दांडगा अभिमान याच गोष्टींवर आपण आजही प्रत्येक अपयशाला सामोरे जातो. उगाचच नको त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचा उद्धार होतो! पण खरच आपण आपली संस्कृती जपली आहे का? ती वाढवली आहे का? ऋषी, मुनी, विज्ञानी यांनी १० हजार वर्षांपूर्वी घडवलेला भारत खरच का आज त्यावेळेहून प्रगत आहे? नाही, नक्कीच नाही संपत्तीच्या हव्यासापोटी आणि परकियांच्या अनुकरणाने आपण आपलीच संस्कृती भ्रष्ट केली आहे. असलेल्या पोथी, पुराणांवर आपण कधी विश्वास टाकलाच नाही आणि ढोंगी, पाखंडी बाबांमुळे परम सिद्धी प्राप्त अश्या सत्पुरुषांवर अजब हालाखी ओढावली. संस्कृतीचा अभ्यास, तिला विस्तृत करण दूर राहील पण आपल्याला तिझ संवर्धन, जतनही नाही करता आल. परिस्थिती आज अशी आहे कि परदेशी भक्त मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. एका बाजूने मानसिक हल्ला करत "भारतीयांना संस्कृतीच नाही" आणि जी आहे ती हल्ली म्हणजे २ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, अशी वक्तव्य करायची आणि मुळात आपल्याच घरात येऊन आपलेच योग, साधना शिकून आपल्या देशांचा उद्धार करायचा असा चंग त्यांनी बांधला आहे. भारतीय कधी या मुद्द्यावर प्रकाश टाकणार देवास ठाऊक...! 

-------------------------------------------------------------------------------------------------------

बेचिराख झालो मी, वेदनांचा धनी
शाश्वत सत्याकडे का हर एक पाठ फिरवी?
कोण धुंदीत फिरते जग सारे?
जळणाऱ्या स्फटिकांना म्हणून तारे...!

सज्जन, सात्विक, निस्वार्थी ईश्वराचा अंश
आपुल्यातही साचलाय तो म्हणे मानव वंश!
स्वार्थावर होऊन स्वार, संपत्ती संचय सदैव
निर्जीव, निश्चल, निरर्थक दगडात बांधला देव

No comments:

Post a Comment