30 Nov 2011

नको करू सखे असा साजिरा शृंगार - संदीप खरे

संदीप खरे यांची एक अप्रतिम कविता आणि अश्या या अप्रतिम कवितेवर मधुरा वेलणकर यांचा तितकाच अप्रतिम अभिनय.. कवितेतल्या प्रत्येक शब्दाला मधुरा वेलणकर यांनी आपल्या अभिनयातून हुबेहूब सादर केले आहे.. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल..  





नको करू सखे असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई?
माज्या मरणाची उगा उठेल आवई!

कशासाठी घालायचे काजल डोळ्यात?
गर्द दोहावर रानी पसरेल रात!

मुखाला लखाकी अशी कशास द्यायची?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटित लपेटू नको काया धुंध फुन्द!
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध!

नको करू सखे असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार!

नको करू सखे! नको करू!!

No comments:

Post a Comment